जाहिरात

Mobile Security: सावधान! Google तुमच्या फोनमधून हा सर्व डेटा गोळा करतोय, 2 मिनिटांत चेक करा संपूर्ण माहिती

Mobile Security: Gmail, Google Maps, YouTube, Chrome आणि Play Store हे सर्व अ‍ॅप्स आपल्या फोनमध्ये असतात आणि आपण दररोज त्यापैकी किमान एका अ‍ॅप्सचा वापर नक्कीच करतो. 

Mobile Security: सावधान! Google तुमच्या फोनमधून हा सर्व डेटा गोळा करतोय, 2 मिनिटांत चेक करा संपूर्ण माहिती
"Google तुमच्या फोनमधून कोणकोणता डेटा गोळा करतोय"
Canva

Mobile Security:आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. यामध्येही आपल्याकडून Google सेवांचा सर्वाधिक वापर केला जातो. Gmail, Google Maps, YouTube, Chrome आणि Play Store हे सर्व अ‍ॅप्स आपल्या फोनमध्ये असतात. आपण दररोज त्यापैकी किमान एकातरी अ‍ॅप्सचा वापर नक्कीच करतो. पण तुम्हाला माहीत आहे का की या अ‍ॅप्सच्या माध्यमातून Google तुमचा डेटा देखील गोळा करत असतो? जाणून घेऊया Google तुमच्या फोनमधून नेमका कोणता डेटा कलेक्ट करतो आणि तो तुम्ही कसा पाहू किंवा कंट्रोल करू शकता.

Google तुमच्या फोनमधून कोणता डेटा कलेक्ट करतो?

Googleचा उद्देश युजरला अधिक चांगली सेवा देण्याचा असतो, पण त्यासाठी तो विविध प्रकारचा डेटा गोळा करतो. उदाहरणार्थ -

  • Location History: जर तुमच्या फोनचे लोकेशन सुरू असेल, तर तुम्ही कुठे जाता, किती वेळ थांबता, कोणता मार्ग वापरता अशी सर्व माहिती सेव्ह होऊ शकते.
  • Search History: तुम्ही Google वर काय-काय सर्च केले आहे, त्याची संपूर्ण हिस्ट्री नोंदवली जाते.
  • YouTube Watch History: तुम्ही कोणते व्हिडीओ पाहिले, किती वेळ पाहिले — हेही ट्रॅक केले जाते.
  • Voice आणि Audio रेकॉर्डिंग: ‘Ok Google', ‘Hey Google' किंवा व्हॉइस सर्चद्वारे दिलेल्या कमांड्स सेव्ह होऊ शकतात.
  • App Activity: याशिवाय तुम्ही कोणते अ‍ॅप कधी आणि कसे वापरले, याची माहितीही साठवली जाऊ शकते.

तुमचा डेटा सेव्ह होत आहे की नाही हे कसे तपासावे?

चांगली गोष्ट म्हणजे Google तुमच्याबाबत कोणता डेटा गोळा करत आहे, हे तुम्ही सहज पाहू शकता. त्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा 

  • सर्वप्रथम आपल्या फोनच्या Settingsमध्ये जा.
  • तिथे Google वर टॅप करा आणि Manage your Google Account निवडा.
  • वर दिलेल्या टॅब्समधून Data & Privacy सेक्शन उघडा.
  • येथे तुम्हाला Web & App Activity, Location History, YouTube History यासंबंधीची संपूर्ण माहिती दिसेल.
  • तुम्ही प्रत्येक कॅटेगरीवर क्लिक करून नेमके कधी, काय आणि किती डेटा सेव्ह आहे हे तपशीलात पाहू शकता.

(नक्की वाचा: Tech News : मोबाईल वापरताना मध्येच येतोय Ads चा अडथळा? फक्त 'ही' सिक्रेट सेटिंग ऑन करा, टेन्शन कायमचं होईल दूर)

तुमचा डेटा कसा कंट्रोल करू शकता?

जर तुम्ही तुमच्या प्रायव्हसीचा गांभीर्याने विचार करत असाल आणि डेटा सुरक्षित ठेवायचा असेल, तर -

  • Location History बंद करा, यामुळे तुमची हालचाल ट्रॅक केली जाणार नाही.
  • Auto-delete Activity पर्याय ऑन करा. यामुळे तुमचा डेटा आपोआप 3, 18 किंवा 36 महिन्यांत डिलीट होईल.
  • Ad Personalisation पर्याय बंद करा. त्यामुळे तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीवर आधारित जाहिराती दाखवल्या जाणार नाही.
  • याशिवाय तुम्ही Voice आणि Audio Activity देखील Pause करू शकता.
हे सर्व का गरजेचं आहे?

तुमचा डेटा हीच तुमची ओळख आहे. जितका अधिक कंट्रोल तुमच्या हातात असेल, तितकी तुमची डिजिटल सुरक्षा अधिक मजबूत असेल. Googleच्या सर्व प्रक्रिया पूर्ण पारदर्शक असते पण तरीही तुम्ही जागरूक राहणं गरजेचं आहे. म्हणून जर तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर आजच या सेटिंग्स तपासा आणि तुमची प्रायव्हसी स्वतःच्या नियंत्रणात ठेवा.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com