PM Modi on GST : स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा केली. देशात 'नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म' आणण्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या टास्क फोर्सचा उद्देश जीएसटी दरांची समीक्षा करणे आणि सामान्य जनतेसाठी टॅक्स कमी करणे हा आहे.
दिवाळीत तुमची डबल दिवाळी होणार आहे. देशवासियांना लवकरच एक मोठं गिफ्ट मिळणार आहे. सामान्य लोकांसाठी टॅक्स कमी होईल आणि जीएसटी दरांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात होईल, असं पंतप्रधान मोदी यांनी यांनी म्हटलं आहे.
(नक्की वाचा- PM Modi Speech: 'दिवाळीत देशवासियांसाठी मोठं गिफ्ट', लाल किल्ल्यावरुन PM मोदींची ऐतिहासिक घोषणा!)
पंतप्रधान मोदींच्या या घोषणेनुसार, दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्यमवर्गीय, अल्प उत्पन्न वर्गातील नागरिक रोज वापरत असलेल्या आणि सध्या 12 टक्के जीएसटी असलेल्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे हे संकेत मानले जात आहेत.
काय होणार बदल?
मिळालेल्या माहितीनुसार, सरकार दोन मुख्य पर्यायांवर विचार करत आहे. पहिला म्हणजे 12 टक्के जीएसटी स्लॅबमधील बहुतेक वस्तू 5 टक्के स्लॅबमध्ये आणणे. दुसरा म्हणजे 12 टक्के स्लॅब पूर्णपणे रद्द करणे.
(नक्की वाचा- PM Modi Speech : "अणूबॉम्बची धमकी आता सहन करणार नाही", PM मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं)
या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता
- टूथ पावडर आणि टूथ पेस्ट
- छत्री
- शिवणकाम मशीन
- प्रेशर कुकर आणि भांडी
- इस्त्री
- गिझर
- लहान वॉशिंग मशीन
- सायकल
- 1000 रुपयांवरील कपडे
- 500 ते 1000 रुपयांवरील बूट-चप्पल
- बहुतांश लसी
- स्टेशनरी
- टाईल्स
- शेतीची अवजारे