जाहिरात

Air India Plane Crash : विजय रुपानी यांच्या लकी नंबरचा योगायोग, शेवटच्या प्रवासाचा कसा आहे संबंध?

विजय रुपानी यांची लकी नंबर अनलकी ठरला आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांचा 1206 हा लकी नंबर होता.

Air India Plane Crash : विजय रुपानी यांच्या लकी नंबरचा योगायोग, शेवटच्या प्रवासाचा कसा आहे संबंध?

Vijya Rupani : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं. या विमानात एकूण 242 प्रवासी होती. यापैकी केवळ एक प्रवासी चमत्कारिकरित्या बचावला आहे. विमानातील 242 प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी देखील होते. ते पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी जात होते. विजय रुपानी यांचा देखील या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. 

विजय रुपानी यांची लकी नंबर अनलकी ठरला आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांचा 1206 हा लकी नंबर होता. विजय रूपानी यांच्याकडे असणाऱ्या सगळ्या गाड्यांचा नंबर देखील 1206 हाच आहे. मात्र दुर्दैव असं की 12 जून अर्थातच 1206 ही तारीख मात्र त्यांच्यासाठी अनलकी ठरली. काल याच तारखेला विमान अपघात झाला आणि विजय रुपानी त्यांचा या अपघातात मृत्यू झाला.

(नक्की वाचा - Air India Plane Crash : ब्लॅक बॉक्स काय असतो? विमान दुर्घटनेचं रहस्य कसं उलगडतं? जाणून घ्या यामागील तंत्रज्ञान)

Latest and Breaking News on NDTV

रुपानी यांच्या पहिल्या स्कूटीचा नंबर असो किंवा त्यांच्या मालकीच्या गाड्या, सर्वांच्या नंबर प्लेटवर 1206 हा नंबर होता. हा नंबर त्यांच्यासाठी नेहमीच भाग्यवान होता. पण कदाचित नशिबावर कोणाचाही ताबा नव्हता आणि 12/06 रोजीच त्यांना मृत्यूने गाठलं. 

(नक्की वाचा - Air India Plane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील किती जण दगावले? मृतांची धक्कादायक यादी आली समोर)

विजय रुपानी यांचा राजकीय प्रवास

रुपानी यांनी सौराष्ट्र विद्यापीठातून बीए आणि एलएलबी पूर्ण केले. भाजपच्या स्थापनेपासूनच ते भाजपशी जोडले गेले आहेत. आणीबाणीच्या काळात, रुपानी यांना भावनगर आणि भूज तुरुंगात 11 महिने तुरुंगवास भोगावा लागला. 1987 मध्ये, ते पहिल्यांदा राजकोट महानगरपालिकेचे (आरएमसी) नगरपरिषद सदस्य म्हणून निवडून आले. 1996 ते 1997 पर्यंत राजकोटचे महापौर होते. रुपानी 2006 ते 2012 पर्यंत राज्यसभेचे खासदार होते. 

ऑगस्ट 2014 मध्ये, गुजरात विधानसभेचे तत्कालीन सभापती वजुभाई वाला यांनी राजकोट पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदारपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर रुपानी यांना त्या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. त्यांनी विजय मिळवला. नोव्हेंबर 2014 मध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. फेब्रुवारी 2016 मध्ये रुपाणी गुजरात भाजपचे प्रमुख झाले. ऑगस्ट 2016 मध्ये आनंदीबेन पटेल यांच्या जागी त्यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. त्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com