Gurgaon News : 'मुलीला बागेत खेळायला घेऊन जातो' असे पत्नीला सांगून एका 38 वर्षीय व्यक्तीने आपल्या दोन वर्षांच्या लेकीला कडेवर घेऊन राहत्या बिल्डिंगच्या 23 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना सोमवारी (16 मार्च) सकाळी हरियाणा राज्यातील गुडगाव शहरातील आहे.
गुडगावमधल्या त्या सोसायटीमध्ये नेमकी घटना काय?
सेक्टर 102 मधील 'जॉयविले सोसायटी' रहिवासी असलेली ही व्यक्ती सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास आपल्या मुलीला घेऊन 23व्या मजल्यावरील टेरेसवर गेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 38 वर्षांच्या पुरुषाने आत्महत्या केल्याची माहिती सकाळी 8 वाजेच्या सुमारास मिळाली, त्यानंतर तातडीने घटनास्थळी पोलीस दाखल झाले.बाप-लेकीला तातडीने जवळील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, पण त्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कौटुंबिक पार्श्वभूमी
मृत व्यक्ती गेल्या दोन वर्षांपासून आपल्या पत्नी आणि मुलीसह या सोसायटीत राहत होती. हे कुटुंब मूळचे दिल्लीतील नांगलोई येथील असून ते दिल्लीतील किरारी भागात त्यांची इयत्ता पाचवीपर्यंतचे एक खासगी शाळा चालवत होते.
(नक्की वाचा: Pune Crime: बारामती हादरलं! कॉलेजसाठी घराबाहेर पडली, 6 दिवसांनी प्रतीक्षाचा विहिरीत मृतदेह; नेमकं काय घडलं?)
आत्महत्येचे नेमकं कारण काय?मृत व्यक्तीच्या भावाने पोलिसांना सांगितले की, कोव्हिड काळापासून त्याला आरोग्याच्या विविध समस्या भेडसावत होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीच्या एका डोळ्याची दृष्टी पूर्णपणे गेली होती, तर दुसऱ्या डोळ्याची दृष्टीही कमी होत चालली होती. या शारीरिक व्याधींमुळे तो गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात आणि चिंतेत होता.
(नक्की वाचा: Malad News: मुंबईतल्या या स्टोअरमध्ये ग्राहकाकडून 860 kg साखरेचा घोटाळा; स्टोअरला लावला हजारो रुपयांचा चुना, कसा? वाचा)
पोलीस तपास सुरूया घटनेचा नेमका क्रम काय होता आणि स्वतःसोबत आपल्या निष्पाप मुलीलाही त्याने टोकाचे पाऊल उचलण्यास का भाग पाडले? याचा तपास पोलीस करत आहेत. टेरेसवर जाण्यापूर्वी आणि उडी मारण्यापूर्वी नक्की काय घडले, याचा शोध घेण्यासाठी पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत.
| Helplines | |
|---|---|
| Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
| TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
| (If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) | |