देवा राखुंडे, बारामती:
Pune Crime: पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातून एक हादरवुन टाकणारी बातमी समोर आली आहे. गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या २१ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने माळेगाव बुद्रुक परिसरात खळबळ उडाली आहे. प्रतिक्षा मेमाणे असे या मृत मुलीचे नाव आहे. या भयंकर घटनेने कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून तरुणीसोबत नेमकं काय घडलं? याचा तपास सध्या सुरु आहे.
२१ वर्षीय तरुणीचा विहिरीत मृतदेह
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बारामती तालुक्यातील शारदानगर माळेगाव बुद्रुक परिसरातील बेपत्ता असलेली 21 वर्षीय तरुणी थेट मृताअवस्थेत आढळून आली आहे.माळेगाव खुर्द-केव्हीके रस्त्यालगत असणाऱ्या एका विहिरीमध्ये या 21 वर्षीय तरुणीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याची माहिती समोर येत आहे.
प्रतीक्षा दत्तात्रय मेमाणे असं मृत तरुणीचे नाव असून ती गेल्या सहा दिवसापासून बेपत्ता होती या संदर्भात तिच्या वडिलांनी माळेगाव पोलीस ठाण्यामध्ये मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. प्रतीक्षा ही नऊ मार्च रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कॉलेजला जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र त्यानंतर ती कॉलेजला ही गेली नाही आणि घरी देखील परत आली नाही.
मुलगी घरी परत आली नसल्याने प्रतीक्षा चे वडील दत्तात्रय मेमाणे यांनी माळेगाव पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शनिवारी एका विहिरीच्या पाण्यावर या तरुणीचा मृतदेह आढळून आला. ही आत्महत्या की हत्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता माळेगाव पोलीस करत आहेत.
(नक्की वाचा- Chandrapur News: नवस फेडायला गेले अन् भयंकर घडलं! सातबहिणी डोंगरावर थरार; 3 वर्षांच्या चिमुरडीसह चौघे जखमी)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world