जाहिरात

Malad News: मुंबईतल्या या स्टोअरमध्ये ग्राहकाकडून 860 kg साखरेचा घोटाळा; स्टोअरला लावला हजारो रुपयांचा चुना

Malad News: मुंबईच्या मालाडमधील एका प्रसिद्ध डिपार्टमेंटल स्टोअरला एका ग्राहकाने 860 किलो साखरेचा गंडा घातला. बारकोडमध्ये फेरफार करून केलेली ही अजब फसवणूक कशी उघड झाली? वाचा सविस्तर बातमी.

Malad News: मुंबईतल्या या स्टोअरमध्ये ग्राहकाकडून 860 kg साखरेचा घोटाळा; स्टोअरला लावला हजारो रुपयांचा चुना
"Malad News | Barcode Cheating : मालाडमध्ये 860 किलो साखरेची अफरातफर"
Canva

Malad News: मुंबईतील मालाड परिसरातील एका नामांकित डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये फसवणुकीची एक अत्यंत धक्कादायक आणि अजब घटना उघडकीस आली आहे. एका अज्ञात ग्राहकाने गेल्या सात महिन्यांपासून स्टोअरला गंडा घालत तब्बल 860 किलो साखरेची अफरातफर केली आहे. याप्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध 37,000 रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

स्टोअरमध्ये नेमकं काय घडलं? 

TOIने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित स्टोअरमध्ये साखरेची 50 किलोची मोठी पोती विक्रीसाठी उपलब्ध असतात. स्टोअरच्या नियमानुसार या 50 किलोच्या प्रत्येक पोत्यावर दोन बारकोड लावलेले असतात, एक 30 किलोचा आणि दुसरा 20 किलोचा. ग्राहकाने बिलिंग काउंटरवर गेल्यावर दोन्ही बारकोड स्कॅन करून 50 किलोचे पैसे भरणे अपेक्षित असते.

(नक्की वाचा: Eggs Expiry Date: मोठा निर्णय! 1 एप्रिलपासून अंड्यांवर एक्स्पायरी डेट बंधनकारक, व्यापारी-शेतकऱ्यांसाठी नवे नियम जाहीर)

भामट्याची अजब शक्कल

जुलै 2025 ते जानेवारी 2026 या सात महिन्यांच्या कालावधीत एका ग्राहकाने एकूण 43 वेळा साखरेची पोती खरेदी केली. पण प्रत्येक वेळेस हा ग्राहक अतिशय चतुराईने पोत्यावरील 20 किलोचा बारकोड काढून टाकत असे. बिलिंग काउंटरवर पोहोचल्यावर केवळ 30 किलोचा बारकोड स्कॅन केला जात असे. जेव्हा कर्मचाऱ्यांना संशय यायचा किंवा वजनाबद्दल विचारणा व्हायची, तेव्हा हा ग्राहक हुशारीने कर्मचाऱ्यांवर दबाव टाकायचा आणि पोत्यात फक्त 30 किलोच साखर असल्याचा दावा करून उरलेली 20 किलो साखर विनामूल्य मिळवायचा. अशा प्रकारे प्रत्येक वेळी 20 किलो साखरेचे पैसे न भरता त्याने एकूण 860 किलो साखर फुकट मिळवली.

(नक्की वाचा: How To Recycle Old Clothes: जुन्या कपड्यांचे मिळतील हजारो रुपये, रक्कम देण्यासाठी माणूस येईल थेट तुमच्या घरी; भारतात 3 पोर्टल सुरू)

स्टोअरच्या तक्रारीवरून बांगूर नगर पोलिसांनी आता या स्मार्ट चोराचा शोध सुरू केला आहे. बारकोडमधील तांत्रिक बाबींचा फायदा घेऊन ग्राहकाने स्टोअरला गंडा घातल्याने व्यापारी वर्गात खळबळ माजली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com