इमारतीत बॉम्ब आहे...! Interview रोखण्यासाठी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाने केलं मोठं कांड

प्रेमात वेडा झालेल्या अनिकेत पॉलने लंडनच्या एका विद्यापीठातून LLM चं शिक्षण घेतलं आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

एकतर्फी प्रेमातून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका माथेफिरू तरुणाने आपल्या आवडल्या तरुणीची नोकरीची  मुलाखत थांबविण्यासाठी संतापजनक पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. तरुणीची मुलाखत थांबविण्यासाठी डीएलएफ नावाच्या इमारतीला बॉम्ब उडवून देण्याची धमकी दिली आहे. तरुणाला वाटलं तरुणी त्याच्या मदतीसाठी त्याला संपर्क करेल. विशेष म्हणजे हा आरोपी कुणी अडाणी नाही तर लंडनमधून एलएलएम करुन आलेला आहे. हा प्रकार हरयाणातील गुरुग्राममधून समोर आला आहे. 

एकतर्फी प्रेमातन वेडा होता माथेफिरू तरुण...

मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या तरुणाचं नाव अनिकेत पॉल आहे. हा २९ वर्षांचा आहे. अनिकेत मूळचा कोलकत्याचा राहणारा. तो गुरुग्राममध्ये भाड्याच्या घरात राहतो आणि एका खासगी कंपनीत कायदेशीर बाबी पाहतो. अनिकेत पॉलने मंगळवारी दुपारी १.१५ वाजता कंपनीला एक मेल पाठवून धमकी दिली होती. त्याने ही धमकी एका तरुणीची नोकरीची मुलाखत रोखण्यासाठी दिली होती. 

Advertisement

नक्की वाचा - BSNL च्या संचालकांचे 'शाही शौक', 50 अधिकारी दिमतीला; अंडरगार्मेंट्स, कंगवा, तेल...यादी पाहून मंत्री संतापले

लंडनच्या विद्यापीठातून घेतलंय शिक्षण...

डीएलएफ एसीपी विकास कौशिक यांनी सांगितलं की, मेलबाबत कळताच गुरूग्राम पोलीस तातडीने अॅक्शन मोडवर आली. पोलिसांची टीम घटनास्थळावर पोहोचली. डॉग स्क्वॉड टीम, फायरब्रिगेड आणि HDRF च्या टीमला बोलावून घटनास्थळाचं निरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या. तपासादरम्यान बॉम्ब सापडला नाही. गुरुग्राम पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अनिकेत पॉलने लंडनच्या एका विद्यापीठातून LLM चं शिक्षण घेतलं आहे. 

पोलिसांनी सांगितलं की, आरोपीने आपला गुन्हा कबुल केला आहे. तो त्या तरुणीला बऱ्याच काळापासून ओळखत होता. त्याचं तरुणीवर एकतर्फी प्रेम होतं. मात्र तरुणीने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. ज्यामुळे त्याने रागाच्या भरात तरुणीना नोकरी मिळू नये यासाठी हा प्लान आखला.