जाहिरात

Crime News: सासऱ्याच्या मृत्यूनंतर ढसाढसा रडत होती सून; पोलिसांनी तपासाची सूत्रं फिरवली अन् सगळेच हादरले

पोलिसांनी आरोपी सून ललिता आणि तिचा प्रियकर करतार या दोघांनाही अटक केली आहे. ललिताने पोलीस तपासावर आणि पोलिसांवरच गंभीर आरोप केले होते.

Crime News: सासऱ्याच्या मृत्यूनंतर ढसाढसा रडत होती सून; पोलिसांनी तपासाची सूत्रं फिरवली अन् सगळेच हादरले
  • हरियाणा के यमुनानगर में एक बहू ने अपने पिता जैसे ससुर को प्रेमी के हाथों मरवा दिया.
  • ससुर की हत्या के बाद आरोपी बहू ही चीख-चीख कर इंसाफ की गुहार लगाते हुए पुलिस पर ही आरोप लगा रही थी.
  • परिवार इस बात से हैरान है कि बहू ललिता ने ही ससुर ओमप्रकाश की हत्या करवाई है.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Haryana Crime News: नात्यांना काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना हरियाणातील यमुनानगरमध्ये समोर आली आहे. एका सुनेने आपल्या सासरच्यांनाच क्रूरपणे संपवल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. हत्येच्या घटनेनंतर तीच सर्वात जास्त आक्रोश करत होती, त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तपास केला असता, एका भयावह गुन्ह्याचा उलगडा झाला. कुणीही विचार केला नसेल, असा हा प्रकार उघडकीस आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

ही घटना यमुनानगरमधील रादौर येथे पाच दिवसांपूर्वी घडली. ओमप्रकाश नावाच्या एका व्यक्तीचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह त्यांच्याच वाड्यामध्ये आढळला होता. या हत्येनंतर त्यांची सून ललिता सर्वात जास्त आक्रोश करत होती आणि आरोपींना पकडण्याची मागणी करत होती. 'जोपर्यंत मारेकरी पकडले जात नाहीत, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही,' असेही तिने म्हटले होते. कारण, त्यांच्या कुटुंबात 25 दिवसांमध्ये झालेली ही दुसरी हत्या होती.


Latest and Breaking News on NDTV

(नक्की वाचा - Shocking CCTV: 'वायफाय' वरुन वाद, हैवान लेकाने आईचा जीव घेतला, निर्दयी कृत्याचा भयंकर VIDEO)

संशयामुळे उघडकीस आले सत्य

मृत ओमप्रकाश यांच्या नातवाचा 20 दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. पश्चिम यमुना कालव्यात त्याचा मृतदेह तरंगताना आढळला होता. पोलिसांनी या प्रकरणातही ललितावर संशय व्यक्त केला आहे आणि त्या हत्येबद्दलही तिची चौकशी सुरू आहे.

Latest and Breaking News on NDTV

अनैतिक संबंधातून हत्या

ओमप्रकाश यांचा गळा चिरून त्यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासात समोर आले की, ललिताचे करतार नावाच्या व्यक्तीसोबत अवैध संबंध होते. ओमप्रकाश यांना हे अवैध संबंध कळले होते आणि ते त्याचा पर्दाफाश करण्याची शक्यता होती. त्यामुळे बदनामीच्या भीतीने ललिताने प्रियकर करतारसोबत मिळून ओमप्रकाश यांना संपवण्याचा कट रचला. तिने आधी सासरच्यांना वाड्यामध्ये झोपायला पाठवले आणि तिथेच त्यांची हत्या केली.

(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar : रात्रभर गप्पागोष्टी करत पेगवर पेग रिचवले; अचानक गोळीबार, मित्रानेच मित्राला संपवलं)

Latest and Breaking News on NDTV

पोलिसांनी आरोपी सून ललिता आणि तिचा प्रियकर करतार या दोघांनाही अटक केली आहे. ललिताने पोलीस तपासावर आणि पोलिसांवरच गंभीर आरोप केले होते. मात्र आता पोलिसांनी या प्रकरणाची गुंतागुंत सोडवल्यानंतर ती काहीही बोलू शकलेली नाही. पोलीस पुढील चौकशीसाठी ललिताला रिमांडवर घेणार आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com