Trending News : एका प्रेमप्रकरणाने अख्खं गाव हादरून गेलं आणि पंचायतीने थेट असा निर्णय घेतला की जो ऐकून कुणालाही धक्का बसेल. आपल्या समाजात लग्नाचे अनेक नियम असतात, पण एका गावाने तर चक्क गावच्याच लेकी-सुनेशी लग्न करण्यावर बंदी घातली आहे. हा निर्णय ऐकल्यानंतर तुम्हालाही वाटेल की आपण नक्की कोणत्या युगात जगत आहोत. सामाजिक मर्यादा राखायची की वैयक्तिक स्वातंत्र्य जपायचे, या वादात आता एक संपूर्ण गाव पेटून उठलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
हरियाणा राज्यातील फतेहाबाद जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या जिल्ह्यातल्या ब्राह्मणवाला नावाच्या गावात ग्रामपंचायतीने हा वादग्रस्त निर्णय घेतला आहे. या गावात गेल्या काही दिवसांपासून काही अशा घटना घडल्या ज्यामुळे गावातील वातावरण गढूळ झालं होतं.
तरुणांचे आपल्याच गावातील तरुणींशी किंवा विवाहित महिलांशी प्रेमसंबंध जुळण्याचे प्रमाण वाढले होते. काही तरूणांनी तर चक्क पळून जाऊन किंवा गुपचुप लग्न उरकल्याने गावातील मोठ्या मंडळींमध्ये संतापाची लाट होती. शेवटी या सगळ्यावर तोडगा काढण्यासाठी गावकऱ्यांनी आणि पंचायतीने एकत्र येत एक कठोर फर्मान जाहीर केलं आहे. आता या गावातील कोणताही मुलगा त्याच गावातील कोणत्याही मुलीशी किंवा सुनेशी लग्न करू शकणार नाही.
( नक्की वाचा : Trending News : सावधान! महिलांनी कॅमेरा फोन वापरला तर होणार कारवाई; 15 गावांनी लागू केला जाचक नियम )
नियम मोडला तर ....
पंचायतीने केवळ बंदी घालून थांबवलं नाही, तर अत्यंत कडक शिक्षेची तरतूदही केली आहे. जर गावातील कोणत्याही मुलाने या नियमाचा भंग केला आणि गावातीलच लेकी-सुनेशी लग्न केलं, तर त्याला त्याच्या पत्नीसह त्याच क्षणी गाव सोडावं लागणार आहे. म्हणजे एक प्रकारे लग्नानंतर त्यांना गावातून हाकलून दिलं जाईल.
एवढंच नाही, तर अशा प्रेमी युगुलांना मदत करणाऱ्यांच्या विरोधातही पंचायत कडक पावले उचलणार आहे. आदेश न मानणाऱ्यांसोबत काही अघटीत घडलं, तर त्याला ते स्वतः जबाबदार असतील, अशी धमकीवजा सूचनाही देण्यात आली आहे.
सरपंच प्रतिनिधी जीवन सिंह यांनी या निर्णयाचे समर्थन करताना सांगितलं की, गावात नैतिक पतन होत आहे आणि लिव्ह-इन रिलेशनशिपसारख्या गोष्टींमुळे गावची संस्कृती धोक्यात आली आहे. ही सामाजिक कुप्रथा संपवण्यासाठीच असा निर्णय घेतल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे.
( नक्की वाचा : Pune News : 9 वीच्या मुलीनं चक्क शिक्षिकेला केलं प्रपोज, मैत्रिणीला वॉशरुममध्ये गाठले आणि... पुणे हादरले! )
पंचायतीने जरी हा निर्णय गावची प्रतिष्ठा जपण्यासाठी घेतला असल्याचा दावा केला असला, तरी कायद्याच्या दृष्टीने हे प्रकरण गुंतागुंतीचं ठरू शकतं. भारतीय कायद्यानुसार, कोणत्याही दोन सज्ञान व्यक्तींना आपल्या आवडीनुसार विवाह करण्याचा अधिकार आहे. अशा परिस्थितीत पंचायतीने दिलेला गाव निकाला देण्याचा आदेश हा मानवी हक्कांचे उल्लंघन मानला जाऊ शकतो. त्यामुळे हा निर्णय केवळ चर्चेचा विषय न ठरता भविष्यात पोलीस आणि कोर्टापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world