जाहिरात
Story ProgressBack

हरियाणामध्ये शाळेची बस उलटून भीषण अपघात! 6 मुलांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Haryana Bus Accident: हरियाणातील उन्हानी गावाजवळ शाळेच्या बसला भीषण अपघात झाला आहे. दुर्घटनेमध्ये अनेकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Read Time: 2 min
हरियाणामध्ये शाळेची बस उलटून भीषण अपघात! 6 मुलांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Haryana School Bus Accident: हरियाणातील नारनौल शहरामध्ये शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बस उलटून भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेमध्ये सहा मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर 12 मुले गंभीर जखमी झाले आहेत. नारनौल शहरामधील उनहानी गावाजवळ जी.एल.पब्लिक शाळेच्या बसला अपघात झाला. पण ईद सणानिमित्त शासकीय सुटी असतानाही शाळा का सुरू होती? असा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बसचे फिटनेस सर्टिफिकेटही कालबाह्य झाले होते. फिटनेस सर्टिफिकेटशिवाय बसमधून मुलांना शाळेत नेण्याचे काम सुरू होते. तसेच चालक मद्यधुंद अवस्थेतच गाडी चालवत होता, अशी धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. 

उत्तर प्रदेशातही शाळेच्या बसचा झाला होता अपघात

यापूर्वी 2 एप्रिल 2024 रोजी देखील अशीच घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बाराबंकी जिल्ह्यातील देवा पोलीस स्टेशन हद्दीतील सालारपूर गावाजवळ घडली होती. लखनौमध्ये सहलीवरून परतणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरलेली शाळेची बस उलटल्याने 12 ते 13 वर्षे वयोगटातील तीन मुलांसह कंडक्टरचा मृत्यू झाला, तर 32 मुले जखमी झाली होती. अपघाताच्या वेळेस बसचा वेग खूप होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाईकस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये ही दुर्घटना घडली.   

आणखी वाचा

पोट दुखतं म्हणून हॉस्पिटलमध्ये गेली, डॉक्टरांनी केले भलतेच उपचार, पुढे काय झाले? 

लोकसभेचा उमेदवार, हातात वस्तरा, मतांसाठी काय केलं?

छत्तीसगडमध्ये खोल दरीत बस कोसळून भीषण दुर्घटना, 12 जणांचा मृत्यू

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination