PM Modi in Kanpur: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (30 मे) उत्तर प्रदेशातील कानपूरमधून पाकिस्तानला कानपूरच्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले. कानपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केल्यानंतर आयोजित सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले, 'कानपूरच्या भाषेत सांगायचं झाल्यास, शत्रू कुठेही असो, त्याला ठेचून काढले जाईल. (हौंक देंगे) '
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले पंतप्रधान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बोलताना पुढे म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताच्या स्वदेशी शस्त्रास्त्रांची आणि 'मेक इन इंडिया'ची ताकद जगाने पाहिली आहे. आपल्या भारतीय शस्त्रास्त्रांनी ब्रह्मोस क्षेपणास्त्राने शत्रूच्या घरात घुसून विनाश घडवला आहे. जिथे लक्ष्य निश्चित केले, तिथे धमाके केले.'
पाकिस्तानचा खेळ चालणार नाही
कानपूरमधील सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानलाजोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, 'पाकिस्तानचा खेळ आता चालणार नाही. कानपूरच्या भाषेत सांगायचं झाल्यास, शत्रू कुठेही असो, त्याला ठेचून काढले जाईल.
( नक्की वाचा : PM Modi on Pakistan : 'मोदीचं डोकं थंड, पण रक्त गरम'! पंतप्रधानांनी पुन्हा दिला पाकिस्तानला इशारा )
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, भारताने दहशतवादाविरुद्धच्या आपल्या लढाईत 3 सूत्र स्पष्टपणे निश्चित केली आहेत:
- भारत प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देईल; त्याची वेळ, पद्धत आणि अटी आपले सैन्य स्वतः ठरवतील.
- भारत आता अणुबॉम्बच्या पोकळ धमक्यांना घाबरणार नाही आणि त्याच्या आधारावर कोणताही निर्णय घेणार नाही.
- दहशतवादाचे सूत्रधार आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या सरकारला भारत एकाच दृष्टीने पाहिल.
'ऐशान्याची वेदना आपण सर्वजण समजवू शकतो'
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, 'कानपूरमधील हा विकासाचा कार्यक्रम 24 एप्रिल रोजी होणार होता, पण पहलगाम हल्ल्यामुळे मला कानपूर दौरा रद्द करावा लागला. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या कानपूरचा सुपुत्र शुभम द्विवेदी देखील या क्रूरतेचा बळी ठरला. मुलगी ऐशान्या द्विवेदीची ती वेदना, तो त्रास आणि आतला संताप आपण सर्वजण अनुभवू शकतो. आपल्या भगिनींचा तोच संताप ऑपरेशन सिंदूरच्या रूपात संपूर्ण जगाने पाहिला.'
रडून युद्ध थांबवण्याची मागणी
पंतप्रधान मोदी म्हणाले, 'आपल्या सैन्याने असा पराक्रम केला की पाकिस्तानी सेनेला रडून युद्ध थांबवण्याची मागणी करण्यास भाग पडावे लागले. स्वातंत्र्य संग्रामाच्या या भूमीतून मी सेनेच्या या शौर्याला वारंवार सलाम करतो. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही.