Heart Attack : कोरोना लसीमुळे हार्टअटॅकचा धोका वाढला? ICMR आणि AIIMS चा रिपोर्ट आला समोर

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असेही स्पष्ट केले आहे की, तरुणांमध्ये हार्टअटॅकचं वाढते प्रमाण आणि कोरोना लस यांचा कोणताही संबंध नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

Heart Attack : कोरोनाची लस घेणाऱ्यांमध्ये हार्टअटॅकच प्रमाण वाढलं आहे, अशी चर्चा सातत्याने सुरु आहे. सध्याच्या घडीला हार्टअटॅकचे वाढलेलं प्रमाण आणि कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना हार्टअटॅकचा वाढलेला धोका यावरून चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र कोरोनाच्या साथीनंतर हे प्रमाण वाढल्याचं बोललं जातं. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि AIIMS यांनी याबाबत अभ्यास करुन रिपोर्ट सादर केला आहे. 

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि AIIMS यांनी केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की कोविड-19 नंतर प्रौढांमध्ये अचानक होणाऱ्या मृत्यूंचा कोरोना लसीशी कोणताही संबंध नाही.

(नक्की वाचा-  Cardiac Arrest Vs Heart Attack: कार्डिअ‍ॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये आहे इतका मोठा फरक, दुर्लक्ष करू नका; अन्यथा...)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असेही स्पष्ट केले आहे की, तरुणांमध्ये हार्टअटॅकचं वाढते प्रमाण आणि कोरोना लस यांचा कोणताही संबंध नाही. आरोग्य मंत्रालयाने म्हटलं की, आयसीएमआरने केलेल्या अभ्यासात कोरोना लस आणि हार्टअटॅक यांच्यात कोणताही संबंध आढळला नाही. 

Advertisement

मे ते ऑगस्ट 2023 दरम्यान देशातील 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 47 रुग्णालयांमध्ये हा अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास अशा लोकांवर करण्यात आला जे पूर्णपणे निरोगी होते. परंतु ऑक्टोबर 2021 ते मार्च 2023 दरम्यान अचानक मृत्युमुखी पडले. 

(नक्की वाचा-  Cardiac Arrest Symptoms: Heart Attack येण्यापूर्वी शरीर देते 'हे'संकेत, चुकूनही दुर्लक्ष करू नका!)

कोरोना लसीमुळे तरुणांमध्ये हार्टअटॅकचा धोका वाढलेला नाही, असे अभ्यासात दिसून आले. तरुणांच्या अचानक मृत्यूचा आणि कोरोना लसीचा कोणताही संबंध नाही. जीवनशैली आणि आधीच अस्तित्वात असलेले आजार हे या मृत्यूंचे मुख्य कारण असल्याचं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article