मे महिन्यात उष्णतेच्या लाटेचे दिवस सरासरीपेक्षा जास्त; हवामान विभागाकडून इशारा 

भारतीय हवामान विभागाकडून मे महिन्याच्या हवामानाचे पूर्वानुमान प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

यंदाचा मे महिना सर्वाधिक उष्ण ठरण्याचा शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. 1 मे रोजी भारतीय हवामान विभागाकडून मे महिन्याच्या हवामानाचे पूर्वानुमान प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

विदर्भ, मराठवाडा याच्यासह पश्चिम मध्य प्रदेश, दक्षिण राजस्थान, गुजरात या भागात मे महिन्याचे 8 ते 11 दिवस तीव्र उष्णतेचे असतील असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. उत्तर आणि ईशान्य भारताव्यतिरिक्त संपूर्ण देशात मे महिन्यातील तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात 5 ते 7 आणि 15 ते  30 या काळात उष्णतेच्या लाटा आल्या होत्या. गेल्या 15 वर्षातील उष्णतेची लाट असलेल्या दिवसांचा हा उच्चांक होता. 

Advertisement

मे महिन्यात उष्णतेच्या लाटांच्या संख्येत वाढ होणार असून एरवी 4 ते 8 दिवस असणारे उष्णतेच्या लाटेचे दिवस यंदा 10 ते 20 दिवसांपर्यंत जाणार असल्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांच्या स्थितीमुळे तीव्र ते अतितीव्र उष्णतेचा सामना करावा लागत असल्याचं भारतीय हवामान विभागाचे प्रमुख मृत्यूंजय मोहपात्रा यांनी सांगितलं.  

Advertisement

कोकणातील मे महिना कसा असेल? 
मे महिन्यात शाळांना सुट्टी असल्याने कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी जातात. मात्र यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असल्याने पर्यटनावरही याचा परिणाम पाहायला मिळत आहे. मे महिन्यात कोकणात सरासरीपेक्षा जास्त कमाल आणि किमान तापमानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे हा महिना कोकणवासियांसाठी तापदायक ठरण्याची शक्यता आहे.  

Advertisement

नक्की वाचा - कोविशील्ड लस घेतलेल्यांनी घाबरुन जाऊ नका; सीरम इन्स्टिट्युटने साईड इफेक्ट्सबाबत आधीच दिली होती माहिती

काय काळजी घ्याल?
सध्या तीव्र उन्हाच्या झळा बसत आहेत. भूजल पातळी कमी होत आहे. त्यातच अवकाळी पाऊस व लग्नसराई सुरू आहे. अशा परिस्थितीत जलजन्य आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दूषित पाणी, शिळे अन्न यामुळेही आजार संभवतात. जलजन्य आजारांची लक्षणे दिसताच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. पाणी बदलामुळे आणि दूषित पाण्यामुळे अनेक आजार संभवतात. त्यामुळे अवकाळी पावसाच्या वातावरणात पिण्यासाठी शुद्ध पाणी वापरणे महत्त्वपूर्ण ठरते. पाण्याचा वापर जपून करणे आरोग्यासाठी हितकारक ठरणारे आहे. अशुद्ध पाण्यामुळे होणारे आजार जीवघेणे ठरू शकतात. यामुळे अतिसाराची शक्यता अधिक असते. त्यावर घरगुती उपचारापेक्षा वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरते. लक्षणे आढळल्यास अथवा डॉक्टरांशी संपर्क साधावा, असंही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं. उपचारासाठी औषध साठा उपलब्ध असून पाणी उकळून थंड करून प्यावे. विहीर व टाकीतील पाण्याचे निर्जंतुकीकरण, सार्वजनिक पिण्याच्या टाक्या निर्जंतुकीकरण कराव्यात, पाणी गाळून प्यावे, पाण्यात निर्जंतुक द्रावण टाकावे असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश टापरे यांनी केले आहे.