देशाच्या राजधानीसह या राज्यांत सूर्याचा 'प्रकोप'; हवामान विभागाने सांगितलं कधी मिळणार दिलासा...

मंगळवारी (28 मे) दिल्लीत उष्णतेचे सर्व रेकॉर्ड तोडले.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

देशातील अनेक राज्यात सध्या भीषण उष्णतेचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. मंगळवारीही धक्कादायक परिस्थिती उद्भवली. अनेक राज्यात पार हाफ सेंच्युरीपर्यंत पोहोचला आहे. तर मंगळवारी राजस्थान उष्णतेच्या बाबतीत सर्वात पुढे होते. 

मे महिन्याचे 2-3 दिवस शिल्लक आहेत. मात्र लोकांना उष्णतेच्या तीव्र झळांपासून दिलासा मिळू शकलेला नाही. राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात राज्यात उष्णतेचा कहर आहे. मंगळवारी दिल्लीने उष्णतेच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड तोडले. येथील नजफगढ भागातील पारा 49.8 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. आतापर्यंतचं हे सर्वात जास्त तापमान आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस सुर्य अशाच प्रकार आग ओकत राहील. 

दिल्लीत पारा 49.8 अंश सेल्सिअरपर्यंत...
मंगळवारी (28 मे) दिल्लीत उष्णतेचे सर्व रेकॉर्ड तोडले. येथे अधिकतर भागात 48 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचलं आहे. आजही या भागात गरम वाऱ्यामुळे लोकांना मनस्ताप सहन करावा लागेल. 

Advertisement

आयएमडीने राजस्थानातील अनेक जिल्ह्यात उष्णतेबाबत रेड अलर्ट जारी केला आहे. मंगळवारीदेखील राजस्थानातील अनेक भागात तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे. तर किमान तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात आलं आहे. येत्या काही दिवसात हा पारा कमी होण्याची शक्यता कमी असल्याचं सांगण्यात येत आहे. 

नक्की वाचा - विदर्भात तापमानात रेकॉर्डब्रेक वाढ, ब्रम्हपुरीत 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

या राज्यांना इशारा...
हवामान विभागानुसार, उत्तर प्रदेशासह देशातील अनेक भागात पंजाब, हरियाणा-चंदीगड, पश्चिम मध्य प्रदेश, राजस्थान, बिहारमध्ये उष्णतेमुळे लोकांना त्रास सहन करावा लागेल. या राज्यात उष्णतेमुळे IMD ने रेड अलर्ट जारी केला आहे. त्याशिवाय लोकांनी महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं असे निर्देश देण्यात आले आहेत. 

Advertisement