जाहिरात

Shimla Cloudburst : शिमल्यात ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान, अनेक वाहनं पुरात वाहून गेली, नागरिकांचं मोठं नुकसान

हवामान विभागाने 24 मे ला शिमल्यात ऑरेंज अलर्ट जारी केला होता. हवामान विभागाने 30 मे पर्यंत यलो जारी केला आहे आणि अशा परिस्थितीत, पुढील 6 दिवस हिमाचल प्रदेशात वादळ आणि पावसाची शक्यता आहे.

Shimla Cloudburst : शिमल्यात ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान, अनेक वाहनं पुरात वाहून गेली, नागरिकांचं मोठं नुकसान

हिमाचल प्रदेशाची राजधानी शिमलामध्ये शनिवारी सायंकाळी पावसाची जोरदार फटकेबाजी झाली. रात्रीच्या वेळी शिमलामधील रामपूर भागात ढगफुटीची सूचना मिळाली होती. त्यानंतर रामपूरजवळील जगातखाना भागात ढगफुटीमुळे मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. येथे अनेक गाड्या पुरात वाहून गेल्या आहेत. सध्या रात्रीपासून घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी 6 वाजेदरम्यान रामपूरच्या बगलतमधील जगातखाना भागात अचानक ढगफुटी झाली. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. ढगफुटीमुळे वरून डोंगरावरील मोठ्या प्रमाणात ढिगारा खाली आला.  ज्यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांचं नुकसान झालं. 

पुढील सहा दिवसांपर्यंत अलर्ट...
हवामान विभागाने 24 मे ला शिमल्यात ऑरेंज अलर्ट जारी केला होता. हवामान विभागाने 30 मे पर्यंत यलो जारी केला आहे आणि अशा परिस्थितीत, पुढील 6 दिवस हिमाचल प्रदेशात वादळ आणि पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने 25 आणि 26 मेच्या सिरमौर, सोलन, शिमला, मंडी, कुल्लू, कांगडा आणि चंबा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा अलर्ट आहे. तर 27-28 मे दरम्यान संपूर्ण राज्यात वादळी वारे आणि विजेच्या कडकडासह यलो अलर्ट जारी केला आहे. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com