जाहिरात
This Article is From May 01, 2024

सप्तपदीशिवाय हिंदू विवाह अमान्य; लग्नाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने विवाहाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सप्तपदीशिवाय हिंदू विवाह अमान्य; लग्नाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली:

सर्वोच्च न्यायालयाने विवाहाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर पुन्हा एक चर्चा सुरू झाली आहे. हिंदू विवाह एक संस्कार आहे आणि हा गाणं बजावणं किंवा जेवणाचा सोहळा नाही. अपेक्षित विधी न केल्यास हिंदू विवाह अमान्य आहे. त्यामुळे अशा प्रकारचे विवाह वैध मानले जात नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयात हिंदू विवाह अधिनियम 1955 अंतर्गत हिंदू विवाहच्या कायदेशीर आवश्यकता आणि पवित्रतेला स्पष्ट केलं आहे. 

यावेळी सर्वोच्च न्यायालयाने हिंदू विवाह कायदा वैध होण्यासाठी सप्तपदीसारखे विधी होणं आवश्यक असल्याचं सांगितलं. विवादित प्रकरणात हा  सोहळा पुरावा ठरतो.  न्यायमूर्ती बी. नागरत्ना यांनी निर्णय देताना सांगितलं की, हिंदू विवाह एक संस्कार आहे. ज्याला भारतीय समाजात मोलाची संस्था म्हणून दर्जा मिळायला हवा. त्यामुळे विवाह संस्थेत प्रवेश करण्यापूर्वी याबाबत विचार करा असा आग्रह आम्ही तरुण पुरुष आणि महिलांना करीत असतो. ते पुढे म्हणाले, विवाह हा गीत आणि नृत्य आणि दारू पिणं आणि खाण्याचा कार्यक्रम नाही. विवाह व्यावसायिक देण्या-घेण्याचा कार्यक्रम नाही. हे भारतीय समाजातील महत्त्वपूर्ण आयोजन आहे, ज्यामध्ये एक पुरुष आणि एक महिला यांच्यातील संबंध स्थापित करण्यासाठी साजरा केलं जातं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: