जाहिरात

अनेक SIM कार्ड वापरत असाल तर होईल तुरुंगवास! 2 लाखांचा दंडही होणार, वाचा सविस्तर

सध्याच्या डिजिटल युगात एकापेक्षा जास्त सिम कार्ड वापरणे ही सामान्य बाब आहे. पण, तुमच्या नावावर अनेक सिमकार्ड असतील तर तु्म्हाला अनेक कायदेशीर आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात.

अनेक SIM कार्ड वापरत असाल तर होईल तुरुंगवास! 2 लाखांचा दंडही होणार, वाचा सविस्तर
मुंबई:

सध्याच्या डिजिटल युगात एकापेक्षा जास्त सिम कार्ड वापरणे ही सामान्य बाब आहे. पण, तुमच्या नावावर अनेक सिमकार्ड असतील तर तु्म्हाला अनेक कायदेशीर आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात. अनेकांना याबाबत फारशी माहिती नसते. टेलिकम्युनिकेशन अ‍ॅक्ट 2023 मध्ये अधिक सिम कार्ड वापरण्याबाबत कठोर नियमांची तरतूजद करण्यात आली आहे. त्यामध्ये मोठा आर्थिक दंड ते तुरुंवासापर्यंतच्या शिक्षेचा समावेश आहे. 
'Financial Express' नं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

किती सिमकार्ड वापरण्याची परवानगी?

एक व्यक्तीला जास्तीत जास्त सिमकार्ड वापरण्याची मर्यादा ही त्याच्या भौगोलिक स्थानावरुन निश्चित होते. देशातील बहुतेक भागात एका व्यक्तीला 9 सिमकार्ड वापरण्याची परवानगी आहे. पण, जम्मू काश्मीर आसाम आणि ईशान्य भारतामधील काही भागात कमाल  6 सिमकार्ड वापरता येतात. फसवणुकीचे व्यवहार टाळ्यासाठी आणि दूरसंचार सेवेच्या योग्य व्यवस्थापनासाठी हा नियम करण्यात आला आहे. 

( नक्की वाचा : Voter ID डाऊनलोड कसा करणार? वाचा सोपी पद्धत, काही मिनिटांमध्येच होईल काम )
 

नियम मोडल्यानंतर किती दंड?


एखाद्या व्यक्तीनं कमाल सिमकार्डची मर्यादा ओलांडली तर त्याला पहिल्यांदा 50 हजार रुपयांचा दंड होईल. त्यानंतरच्या प्रत्येक उल्लंघासाठी ही रक्कम 2 लाखांपर्यंत वाढू शकते. सिमकार्ड वापरण्याची मर्यादा ओलांडल्यानंतर अतिरिक्त सिमकार्ड कार्ड डिस्कनेक्ट करण्यापलिकडे कोणतीही तरतूद यापूर्वी नव्हती. पण, 2023 मधील नव्या कायद्यानुसार या प्रकारचा गुन्हा केला तर 3 वर्षांर्यंतचा तुरुंवास तसंच  50 लाखांपर्यंतच दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद करण्याची तरतूद आहे. 

गैरवापर कसा शोधणार?

एका व्यक्तीच्या नावावर किती सिमकार्ड आहेत हे टेलिकॉम ऑपरेटर सहज चेक करु शकतात. एखादा व्यक्ती तुमच्या नावावर सातत्यानं सिम कार्ड घेत असेल तर त्याबातची माहिती तात्काळ कळवा.  टेलिकम्युनिकेशन विभागाच्या पोर्टलवर एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती सिमकार्ड आहेत हे चेक करण्याची सूविधा आहे. त्या पोर्टलवर रजिस्टर करुन तुम्ही तुमच्या नावावार किती सिमकार्ड आहेत हे नियमित चेक करु शकता. त्यामुळे तुमच्या नावाचा गैरवापर होत असेल तर तो लगेच लक्षात येईल.  

( नक्की वाचा : तुम्ही किती सोनं घरी ठेवू शकता? विक्रीनंतर टॅक्स लागतो का? वाचा नियम )
 

पडताळणी कशी करावी?

एकापेक्षा जास्त सिमकार्ड नावावर असलेल्या युझर्ससाठी टेलिकम्युनिकेशन विभागानं फेरपडताळणी करण्याची पद्धत सांगितली आहे. 7 डिसेंबर 2021 मध्ये जाहीर झालेल्या या नियमावलीनुसार जास्त सिमकार्य वापरणाऱ्या युझर्सकडं अतिरिक्त सिमकार्ड जमा करणे, ट्रान्सफर करणे किंवा डिस्कनेक्ट करणे हे तीन पर्याय आहेत. 


तुमच्या नावावरील सिमकार्ड कसे चेक करणार?

युझर्सच्या सोयीसाठी टेलिकम्युनिकेशन विभागानं 'संचार साथी' हे खास पोर्टल सुरु केलंय. या पोर्टलवर तुम्ही तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड रजिस्टर आहेत हे चेक करु शकता. सिम कार्ड चेक करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे.

- सर्वात प्रथम www.sancharsathi.gov.in. हे वेब पोर्टल ओपन करा
- होमपेजवरील विविध पर्यायांपैकी तुमचा योग्य पर्याय निवडा
- तुमच्या मोबाईल कनेक्शनची माहिती घ्या - मोबाईल कनेक्शनची माहिती घेण्यासाठी पर्याय निवडा
- तुमचा मोबाईल नंबर एडिट करा - नव्या पेजवर तुमचा दहा अंकांचा मोबाईल नंबर एंटर करा
- कॅप्चा पडताळणी करा - स्क्रीनवरील कॅप्चा कोड योग्य पद्धतीनं भरा
- ओटीपी एंटर करा  - तुम्हाला मोबाईलवर ओटीपी येईल. तो ओटीपी नंबर वेबसाईटवर एंटर करा
- रजिस्टर सिम चेक करा - नव्या पेजव तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या सर्व मोबाईल क्रमांकांची माहिती मिळेल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
हैदराबादला स्वतंत्र मुस्लीम देश बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या निजामानं कशी पत्कारली शरणागती?
अनेक SIM कार्ड वापरत असाल तर होईल तुरुंगवास! 2 लाखांचा दंडही होणार, वाचा सविस्तर
Former Police Commissioner Parambir Singh's new allegations against Anil Deshmukh
Next Article
फडणवीसां बरोबर कोणा कोणाला अटक करण्याचे आदेश होते? परमबीर सिंहांचा नवा बॉम्ब