
Women Drink Alcohol: पुरुषांच्या तुलनेत महिला कमी दारू पितात, मात्र गेल्या काही वर्षात हा आकडा सातत्याने वाढत आहे. अल्कोहोल महिला आणि पुरुष दोघांसाठीही धोकादायक आहे. महिलाच्या दारू पिण्याची चर्चा होण्यामागे मध्य प्रदेशातील काँग्रेसचे अध्यक्ष जीतू पटवारी कारणीभूत आहे. त्यांनी महिलांच्या दारू पिण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. मध्य प्रदेशातील महिला सर्वाधिक दारू पितात असं ते म्हणाले होते. भारतात किती महिला दारू पितात आणि याबाबत कोणतं राज्य सर्वात पुढे आहे.
दारू पिण्याचं प्रमाण का वाढतंय?
भारतात, काही दशकांपूर्वीपर्यंत, पुरुष दारू पिण्यात महिलांपेक्षा खूप पुढे होते. परंतु गेल्या काही वर्षांत हा ट्रेंड बदलत आहे. आता महिलांही पुरुषांइतकेच दारू आवडीने पितात. यामागील कारण म्हणजे शहरीकरण, आर्थिक सक्षमीकरण आणि लिंगभेद कमी होणे. दारू प्रत्येक कार्यक्रम किंवा पार्टीचा भाग बनला आहे. त्यामुळे महिलांमध्ये दारू पिणं सामान्य झालं आहे. 2021 पर्यंत, देशभरात हा आकडा 0.7% होता.
नक्की वाचा - तुम्ही जास्त दारू घेतलीय, हँगओव्हर उतर नाही? मग हे 7 घरगुती उपाय करा, नक्की मिळेल आराम
कोणत्या राज्याच्या महिला सर्वाधिक दारू पितात... (which state's women drink the most alcohol)
टाइम्स ऑफ इंडियाने नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेच्या रिपोर्टच्या आधारावर सांगितलं की, आंध्रप्रदेशात सर्वात जास्त महिला दारू पितात. येथे राहणाऱ्या 24 टक्के महिला दारू पितात. येथे घरी येणाऱ्या पाहुण्यांनाही दारू ऑफर केली जाते. ज्यामध्ये अपोंग म्हणजे तांदळाची पिअर प्यायली जाते.
- आंध्र प्रदेशानंतर, सिक्कीमचा क्रमांक लागतो. इथं 16.2% महिला दारू पितात.
- आसाम तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिथे 7,2% महिला दारू पितात.
- तेलंगणा या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. ज्यानुसार 6.7% महिला दारू पितात.
- झारखंडमध्येही 6.1% महिला दारू पितात. आदिवासी भागातही दारू पिणे सामान्य आहे.
- अंदमान-निकोबार आणि छत्तीसगडचाही या यादीत समावेश आहे.
दिल्लीमध्ये काय आहे स्थिती?
दिल्लीचा वरील यादीत समावेश नसला तरी याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. येथे दारू पिणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 2015 पर्यंत येथे 0.6 टक्के महिला दारू पित होत्या. 2019-21 मध्ये यात वाढ होऊन हा आकडा 1.4 टक्क्यांपर्यंत पोहोचला. याच प्रकारे पुरुषांचे दारू पिण्याचे आकडे वाढले आहेत.
सरकारी आकडेवारीत घट?
सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, 2015-16 ते 2019-21 दरम्यान, दारू पिणाऱ्यांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे, ज्यामध्ये पुरुष आणि महिला दोघांचाही समावेश आहे. पूर्वी पुरुषांचे प्रमाण 29.2% होते. जे 22.4 % पर्यंत कमी झाले. त्याच वेळी, महिलांची संख्या 1.2% वरून 0.7% पर्यंत कमी झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world