जाहिरात

BJP : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पगार मिळतो का? आकडा किती? नितीन नवीन यांना कोणत्या सुविधा मिळतील?

भाजप आपल्या राष्ट्रीय अध्यक्षला वेगळा पगार देते का, नितीन नवीन यांना कोणत्या प्रकारच्या सुविधा मिळतील. 

BJP : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पगार मिळतो का? आकडा किती? नितीन नवीन यांना कोणत्या सुविधा मिळतील?

बऱ्याच वेळानंतर भारतीय जनता पक्षाने एक मोठं संघटनात्मक पाऊल उचललं आहे. भाजपने वरिष्ठ नेता आणि बिहार कॅबिनेट मंत्री नितीन नवीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जोपर्यंत कोणी पूर्णवेळ राष्ट्रीय अध्यक्ष नियुक्त होत नाही तोपर्यंत नितीन नवीन अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील. यादरम्यान जाणून घेऊया भाजप आपल्या राष्ट्रीय अध्यक्षला वेगळा पगार देते का, नितीन नवीन यांना कोणत्या प्रकारच्या सुविधा मिळतील. 

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षला सरकारी पगार मिळतो का? 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पद ना संविधानिक आहे नाही सरकारी. त्यामुळे अध्यक्षाला भारत सरकारकडून कोणताही पगार दिला जात नाही. मंत्री, न्यायाधीश किंवा संविधानिक अधिकारांच्या थेट उलट पक्षाचा अध्यक्ष पूर्णपणे संघटनात्मक प्रमुख म्हणून काम करतो. सर्व आर्थिक मदत पक्षाच्या अंतर्गत निधीतून येते, करदात्यांच्या पैशातून नाही.

भाजपकडून दिलं जाणारं मानधन..

सरकारकडून अध्यक्षांना कोणतीही सॅलरी दिली जात नाही. मात्र भाजप आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांना मानधन देतो. पक्षाकडून अद्याप तरी अधिकृतपणे कोणताही आकडा जाहीर केलेला नाही, मात्र मीडियावर आलेल्या काही वृत्तांनुसार, भाजप अध्यक्षांना दरमहा एक लाख ते दीड लाखांचं मानधन मिळतं. 

Nitin Nabin: भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष झालेले नितीन नवीन कोण आहेत? काय आहे राजकीय पार्श्वभूमी?

नक्की वाचा - Nitin Nabin: भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष झालेले नितीन नवीन कोण आहेत? काय आहे राजकीय पार्श्वभूमी?

केंद्रीय मंत्र्यांइतकी सुविधा...

सुविधांबाबत सांगायचं झालं तर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांप्रमाणे विशेषाधिकार मिळतात. जेपी नड्डांकडून पदभार स्वीकारल्यानंतर नितीन नवीन यांनाही अशा प्रकारच्या व्यवस्थांचा हक्क मिळतो. त्यांना दिल्लीत एक सुसज्ज निवासस्थान आणि कार्यालय दिलं जातं. एक टीम दिली जाते. ज्यामध्ये एक खासगी सचिव, राजकीय सल्लागार, मीडिया कर्मचारी आणि सोशल मीडिया मॅनेजरचा समावेश आहे. 

सुरक्षा कवच आणि अधिकृत प्रवास

जेपी नड्डा यांना सध्या झेड-श्रेणीची सुरक्षा आहे आणि नितीन नवीन यांची सुरक्षा गृह मंत्रालयाकडून निश्चित केली जाते. पक्षाच्या कार्यक्रमांसाठी, विमानाने असो वा रस्ते मार्गाने, सर्व अधिकृत प्रवास भाजपकडून केला जातो. देशभरात सुरळीत प्रवासासाठी लक्झरी वाहने, ड्रायव्हरसह उपलब्ध करून दिले जातात. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com