Hyderabad News: अवघ्या 2 महिन्यात संसार उद्ध्वस्त! नवदाम्पत्यासोबत भयंकर घडलं; दोन्ही कुटुंबीयांना धक्का

हैदराबादमधील कुकटपल्ली भागात एका नवविवाहित दांपत्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. मार्च महिन्यातच या जोडप्याचा विवाह झाला होता. अद्याप आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

Hyderabad News: तेलंगणातील कुकटपल्ली परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या एका तरुण दांपत्याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली आहे.

मृतांची ओळख 28 वर्षीय येमजला कार्तिक आणि 27 वर्षीय येरमल्ला मंजुला अशी पटली आहे. कार्तिक एका खाजगी कंपनीत मार्केटिंग विभागात कार्यरत होता, तर मंजुला गृहिणी होती. बालनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) पी. नरेश रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक आणि मंजुला यांचा विवाह याच वर्षी मार्च महिन्यात झाला होता.

Advertisement

शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास कार्तिकचा भाऊ, जो त्याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहतो, तो दांपत्याला नाश्त्यासाठी बोलावण्यास गेला होता. मात्र, घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ हाक मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता कार्तिक मृतावस्थेत आढळून आला.

(नक्की वाचा- Virar Railway Station Protest: प्रवासी ट्रॅकवर उतरले, लोकल रोखली; विरार स्थानकात फुल राडा! नेमकं काय घडलं?)

तपासात धक्कादायक माहिती समोर

भावाने शेजाऱ्यांच्या मदतीने मुख्य दरवाजा तोडला असता, मंजुला बेडवर मृतावस्थेत पडलेली दिसली. दोघांनाही तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कुकटपल्लीचे उपनिरीक्षक के. नरसिंहा यांनी सांगितले की, "कार्तिकच्या शरीरावर काही जखमांच्या खुणा आहेत, मात्र मंजुलाच्या शरीरावर कोणत्याही बाह्य जखमा नाहीत. मंजुलाच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल."

(नक्की वाचा-  Toll Plaza News: मुंबईच्या वेशीवरील 'हा' टोल नाका पुन्हा सुरु होणार? वाहनांकडून होणार वसुली)

कुटुंबीयांना मोठा धक्का

कार्तिकची आई इमारतीच्या तळमजल्यावर, तर मोठा भाऊ दुसऱ्या मजल्यावर राहतो. हे जोडपे पहिल्या मजल्यावर राहत होते. शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत कुटुंब एकत्र होते, तेव्हा सर्व काही सुरळीत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मंजुलाच्या आईने याप्रकरणी तक्रार दाखल केली असून, सासरच्या मंडळींवर कोणताही संशय व्यक्त केलेला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे 'अरेंज मॅरेज' होते. सध्या कुकटपल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

Topics mentioned in this article