Motivational Story : यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवणं हे अनेकांचं स्वप्न असतं. पण खूप कमी लोक ते पूर्ण करू शकतात. हरियाणाच्या सिरसा येथील विजय वर्धन यांची गोष्ट अशा लोकांसाठी एक उत्तम उदाहरण आहे जे अपयशाने खचून जातात. विजय वर्धन यांना एकदा किंवा दोनदा नव्हे, तर तब्बल ३५ वेळा विविध परीक्षांमध्ये अपयश आलं, पण त्यांनी जिद्द सोडली नाही.
२०१४ पासून स्पर्धा परीक्षा देण्यास सुरुवात...
विजय वर्धन यांनी आपलं शालेय शिक्षण सिरसामधून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी हिसारमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतली. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर ते यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीला आले. विजय यांचा प्रवास अत्यंत खडतर होता. २०१४ पासून त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्यास सुरुवात केली. त्यांनी केवळ यूपीएससीच नाही, तर हरियाणा नागरी सेवा, एसएससी आणि इतर अनेक सरकारी परीक्षा दिल्या. पण नशिबाने त्यांची साथ दिली नाही. अशा प्रकारे ३० हून अधिक परीक्षांमध्ये त्यांना अपयश आले.
सततच्या अपयशानंतरही त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. २०१८ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं आणि त्यांची निवड आयपीएस पदासाठी झाली. त्यांना १५४ वी रँक मिळाली होती. मात्र, त्यांचे स्वप्न आयएएस होण्याचं होतं. आयपीएस प्रशिक्षण घेत असतानाच त्यांनी पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. २०१९ च्या परीक्षेत त्यांनी देशात १०४ वी रँक मिळवली आणि त्यांचे आयएएस होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world