जाहिरात

Success Story: सालगड्याच्या मुलाची यशस्वी झेप! 4 वेळा अपयश; 5 व्यांदा करुन दाखवलं; अख्खं गाव भारावलं

स्वतःच्या गावात दोन एकर शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला.आईने ही शेतात मोल रोजमजुरी करत मुलांच्या शिक्षणासाठी दोघांनीही मोठा संघर्ष केला.

Success Story: सालगड्याच्या मुलाची यशस्वी झेप! 4 वेळा अपयश; 5 व्यांदा करुन दाखवलं; अख्खं गाव भारावलं

UPSC Success Story:  जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनत असेल तर कोणतीही परिस्थिती असली तरी कुठला ही अडथळा पार करण्याचा प्रयन्त करतो येतो. हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.  भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील भिकन जगन रोजेकर यांंनी अत्यंत साध्या आणि  गरीब कुटुंबातून आलेल्या भिकन रोजेकर यांनी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत चक्क 812 रँक मिळवत मोठे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे रोजेकर याला चार वेळा अपयश आल्या नंतरही  त्यांनी न खचता पाचव्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झालं असून त्यांनी या यशातून एक आदर्श तरुणांच्या समोर उभा केला.

सालगड्याच्या लेकाची यशस्वी भरारी! 

भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ गावातील भिकन रोजेकर यांचे बालपण अत्यंत साध्या परिस्थितीत गेले. आई- वडिलांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांचे चाळीसगाव तालुक्यातील वाडा गावात सालगडी म्हणून काम  करावं लागलं. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या गावात दोन एकर शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला.आईने ही शेतात मोल रोजमजुरी करत मुलांच्या शिक्षणासाठी दोघांनीही मोठा संघर्ष केला.

मम्मीच्या दुसऱ्या लग्नात मुलीनं असं काही केलं..Instagram चा व्हायरल व्हिडीओ 20 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला

भिकन रोजेकर यांनी जळगाव सपकाळ येथील विनय विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले,नंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील विवेकानंद महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केलं. UPSC सारख्या कठीण परीक्षेत त्यांनी सलग चार वेळा प्रयन्त केला मात्र त्याला या परीक्षेत चारही वेळी अपयशाचा सामना करावा लागला. मात्र त्यांनी खचून न जाता अपयश पचवत त्यांनी हार न मानता दिल्ली गाठत आपला प्रयन्त सुरू केला आणि त्याच्या या जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनतीला अखेर यश येत त्यांनी  पाचव्या प्रयत्नात 812 रँक मिळवत यशाची उतुंग शिखरे गाठली.

गावकऱ्यांनी काढली मिरवणूक

त्याच्या या यशाची बातमी कळताच निकाल जळगाव सपकाळ गावात आनंदाचा जल्लोष पाहायला मिळाला. गावकऱ्यांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला, तर आज भिकन रोजेकर यांची गावातून जंगी मिरवणूक काढची तयारी सुद्धा गावकऱ्यांनी सुरू केलीय. विशेष म्हणजे भिकन यांचा लहान भाऊ विकास रोजेकर हा देखील  काही दिवसांपूर्वीच भारतीय सैन्यात गेला.

नक्की वाचा >>Pune News : बारामतीत सुरु होता सर्वात घाणेरडा प्रकार, भिगवण रोडवरील 'त्या' लॉजवर छापा, परिसरात उडाली खळबळ

त्यामुळे या कुटुंबातील दोन्ही मुलांनी देशसेवेचा मार्ग निवडल्याने गावकऱ्यांचा अभिमान अधिकच वाढला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून येत जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेले हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. भोकरदन तालुक्यासाठी हा नक्कीच अभिमानाचा क्षण  असल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव जिल्हाभरातून केल्या जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com