
भारताने पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर केलं होतं. त्यानुसार पाकिस्तानच्या अनेक शहरांवर भारताने हवाई ड्रोन हल्ले केले. त्यामुळे पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. कराची पासून ते अगदी इस्लामाबादपर्यंत पाकिस्तान भारताच्या कारवाईने हादरले आहेत. या जोरदार कारवाईमुळे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची झोप उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिम भारताच्या एअर स्ट्राईकमुळे घाबरून कराची सोडून पळून गेला आहे. दाऊद इब्राहिमसोबत त्याचे साथीदार अनीस आणि छोटा शकील यांनीही कराची सोडले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारताच्या लष्करी कारवाईमुळे दाऊद इब्राहिम आपल्या साथीदारांसह जीव वाचवण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला आहे. त्याने कराचीतून पळ काढला आहे. त्याला कराचीतून बाहेर काढण्या मागे आयएसआय असल्याचं ही म्हटलं जात आहे. त्याला पाकिस्तानमध्येच दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्याची माहितीही सुत्रांकडून मिळत आहे. दाऊचं संपूर्ण परिवार या हल्ल्यामुळे घाबरला आहे. त्यात पत्नी महजबीन, मुलगा मोईन, त्याचा छोटा भाऊ अनिस इब्राहीम, दाऊदचा डावा हात छोटा शकील यांच्यासह त्याने कराची सोडले आहे. शिवाय दाऊदचा खास शुटर मुन्ना झिंगाडा ही दाऊद बरोबर आहे. याच मुन्नाने छोटा राजनवर बँकॉकमध्ये हल्ला केला होता.
ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? काय केली होती भविष्यवाणी?
7 मे च्या रात्री भारतीय लष्कराने पाकिस्तानची झोप उडवली. पाकिस्तानच्या नऊ शहरातील दहशतवादी अड्ड्यांवर भारताने एअर स्ट्राईक केला. ‘ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केले. या कारवाईत जवळपास 100 दहशतवादी ठार मारले गेल्याची माहिती ही समोर आली आहे. त्याच बरोबर भारताने पाकिस्तानची रडार सिस्टम ही उद्धवस्त करून टाकली होती. भारताने केलेल्या या आक्रमक कारवाईमुळे पाकिस्तानात असलेल्या दाऊदच्या पायाखालची वाळू सरकली. सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी त्याची धावपळ उडाली.
भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. 8 आणि 9 मे 2025 च्या मध्यरात्री पाकिस्तानकडून पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रसामग्रीचा वापर करून अनेक हल्ले केले गेले. जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने अनेक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारताने हे ड्रोन हल्ले प्रभावीपणे परतवून लावले आणि सीएफव्हींना योग्य प्रत्युत्तर देण्यात आले. भारतीय सैन्य राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. सर्व नापाक योजनांना जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असं ट्विट इंडियन आर्मीकडून करण्यात आलं होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world