India Pakistan Ceasefire भारत-पाकिस्तानमधील संघर्ष थांबला, पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारताची घोषणा, पाहा Video

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबला आहे. पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारतानं ही घोषणा केली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
मुंबई:

India Pakistan Ceasefire : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबला आहे. पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारतानं ही घोषणा केली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. यापूर्वी हे दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी तयार झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता.

भारतानं काय सांगितलं?

आज दुपारी 3:35 वाजता पाकिस्तानच्या मिलिटरी ऑपरेशन्सच्या महासंचालकांनी (डीजीएमओ) भारतीय डीजीएमओला दूरध्वनी केला. त्यांच्यात या गोष्टीवर सहमती झाली की दोन्ही बाजू भूमीवर, हवेत आणि समुद्रात भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजल्यापासून सर्व प्रकारची गोळीबारी आणि लष्करी कारवाई थांबवतील.

आज दोन्ही बाजूंनी याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मिलिटरी ऑपरेशन्सचे महासंचालक 12 मे रोजी दुपारी बारा वाजता पुन्हा एकदा चर्चा करतील, असं भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी जाहीर केलं. 

पररराष्ट्रमंत्री काय म्हणाले?

केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी देखील या विषयावर ट्विट करत भारताची बाजू मांडली आहे.

'भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत एक समजूतदारपणा दर्शवला आहे.भारताने नेहमीच सर्व प्रकारच्या आणि स्वरूपातील दहशतवादाविरुद्ध कठोर आणि तडजोड न करणारी भूमिका घेतली आहे. ती यापुढेही कायम राहील,' असं जयशंकर यांनी म्हंटलं आहे.