जाहिरात

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर फत्ते; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी प्रतिक्रिया

भारतीय आर्मीच्या ऑपरेशन सिंदूरनंतर राजकीय नेत्यांनी भारतीय लष्कराचं कौतुक केलं आहे.

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर फत्ते; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी प्रतिक्रिया

काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या बदल्यात भारतीय सैन्याने पीओके आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला असून यामध्ये 62 दहशतवादी मारले गेले आहेत. भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये लश्कर-ए-तैयबाच्या टॉपच्या 2 कमांडोंचा खात्मा करण्यात आला. यामध्ये हाफिज अब्दुल मलिक आणि मुदस्सीर या दोघांचा खात्मा करण्यात आला आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

निष्पापांच्या क्रुर हत्येचा बदला...', गृहमंत्री अमित शहांची मोठी प्रतिक्रिया
भारतीय लष्कराने केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. ऑपरेशन सिंदूर हे पहलगाममध्ये आपल्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताने दिलेले प्रत्युत्तर आहे. भारत दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी वचनबद्ध आहे, असंही अमित शहा यांनी म्हटलं आहे. 

शरद पवारांचे आवाहन...
हा दहशतवाद्यांचा हल्ला झाल्यानंतर कुठलाही देश बघ्याची भूमिका घेऊ शकत नव्हता. त्यामुळे पंतप्रधानांनी भूमिका घेतली ती योग्य होती. सिंदूर हे नाव दिले ते योग्य आहे, कारण काही निष्पाप भगिणींचे कुंकु पुसले गेले त्यामुळे जर हे नाव दिले असेल तर ते योग्य आहे. अशा घटनांवर संकुचित भूमिका घेणे शहाणपणाचे नाही. अशावेळी संयम दाखवावा लागतो. वातावरण पाकिस्तानमध्येसुद्धा मोठा वर्ग पाकिस्तानी नेतृत्वावर नाराज आहे. आज आपण एकत्र राहूया..

ऑपरेशन सिंदूरवरवर मल्लिकार्जुन खरगेंची प्रतिक्रिया
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दिवसापासून, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सीमेपलीकडील दहशतवादाविरुद्ध कोणतीही निर्णायक कारवाई करण्यासाठी सशस्त्र दल आणि सरकारच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. राष्ट्रीय एकता आणि एकता ही काळाची गरज आहे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आपल्या सशस्त्र दलांच्या पाठीशी उभी आहे. आमच्या नेत्यांनी भूतकाळात मार्ग दाखवला आहे आणि आमच्यासाठी राष्ट्रीय हित सर्वोच्च आहे.

देशवासियांच्या एकजुटीतून ‘ऑपरेशन सिंदूर', अजित पवारांची प्रतिक्रिया
भारताने दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत पहलगाममधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून आज पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून नष्ट केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय सैन्यदलांचे आणि ‘ऑपरेशन सिंदूर'मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचे अभिनंदन केले आहे. भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर देशाला पूर्ण विश्वास असून संपूर्ण देश एकजुटीने त्यांच्यामागे उभा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कारवाईचे समर्थन, कौतुक केले आहे.


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com