India Vs Pakistan : पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्यांना भारतीय सैन्याने चोख उत्तर दिलं आहे. जम्मू ते जैसलमेरपर्यंत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून पाकिस्तानने हल्ले केले. भारतीय हवाई संरक्षण प्रणाली S-400 ने हे सर्व हल्ले हाणून पाडले आहेत. मात्र त्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानची झोप उडवली. भारताने देखील पाकिस्तानला त्यांना समजेल अशा भाषेतच उत्तर दिलं आहे. भारताने पाकिस्तानची चार अॅडव्हान्स विमाने पाडली आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तानची सर्वात अॅडव्हान्स विमाने F-16 आणि JF-17 पाडल्याची मोठी बातमी समोर आली आहे. याशिवाय पाकिस्तानचे 8 क्षेपणास्त्रे आणि डझनभर ड्रोनही पाडण्यात आले आहेत. तर काल भारताने पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने JF-17 पाडली होती.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरगोधा येथे पाकिस्तानचे सर्वात प्रगत लढाऊ विमान एफ-16 पाडण्यात आले आहे. लष्कराने या दोन्ही वृत्तांना दुजोरा दिलेला नाही परंतु लष्कराशी संबंधित विश्वसनीय सूत्रांनी याची पुष्टी केली आहे.
नक्की वाचा : तणावाचे रुपांतर आण्विक युद्धात होऊ नये अशी आशा! चर्चेद्वारे वाद मिटवण्याचा अमेरिकेचा सल्ला
रात्रभर काय-काय घडलं?
- LOC जवळ स्फोट, जम्मूत संपूर्ण ब्लॅकआऊट
- भारत सरकारने दिलेल्या आदेशानंतर X ने 8 हजार खाती बंद करण्याचा निर्णय घेतला.
- पाकिस्तानने PSL चे उरलेले सगळे सामने दुबईत खेळवण्याचा निर्णय घेतला.
- शुक्रवारी पहाटे जम्मू कश्मीरमध्ये पूंछ, राजौरीमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले
- भारत-पाकिस्तानमधील तणावात अमेरिका पडणार नाही, चर्चेने प्रश्न सोडवला जावा जेडी वान्स यांचे विधान
- भारत आणि पाकिस्तानातील तणाव आण्विक युद्धाचे रुप घेऊ नये अशी आशा करतो, जेडी वान्स यांचे विधान
- अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्क रुबियो यांनी दोन्ही देशांनी तणाव तत्काळ कमी करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले
- भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी विविध देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी संवाद साधला.
- भारताने पाकिस्तानच्या हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त केल्या.
- त्यानुसार भारतानेही पाकिस्तानवर प्रतिहल्ला चढवला
- भारताने आधीच बजावले होते, कुरापत काढल्यास सोडणार नाही
- पंजाबच्या पठाणकोट, अमृतसर, जालंधर, होशियारपूर, मोहालीसह चंदीगडमध्ये गुरुवारी ब्लॅकआऊट केला
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक बोलावली, शुक्रवारी म्हणजे आज होणार बैठक
- पंजाबमधील शाळा, कॉलेजना पुढील तीन दिवस सुट्टी, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द केल्या.
- सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न BSF ने हाणून पाडला.
- भारताच्या हवाई हल्ला प्रतिरोधक प्रणालीने सगळे हल्ले फोल ठरवले
- जम्मूतील सतवारी, सांबा, आरएस पुरा आणि अरनिलातील गावांना पाकिस्तानने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला
- अखनूर, सांबा, बारामुल्ला और कुपवाडा इथे स्फोटांचे आवाज ऐकू आले, त्यानंतर सायरन वाजू लागले
- भारताने पाकिस्तानची 4 विमाने आणि 8 ड्रोन पाडले
- मिसाईल आणि ड्रोनच्या सहाय्याने हल्ल्याचा प्रयत्न
- जम्मू, पठाणकोट, उधमपूर येथील सैनिकी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न
- पाकिस्तानने गुरुवारी रात्री भारतावर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला.