Pahalgam Attack : भारताकडून पाकिस्तानची आर्थिक कोंडी; आयात आणि निर्यातीवर तात्काळ बंदी

पाकिस्तानमधून थेट किंवा अप्रत्यक्षपणे येणाऱ्या किंवा तेथून निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयात किंवा वाहतुकीवर तात्काळ बंदी लागू करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pahalgam Terrorist Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पाऊल उचललं आहे. भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंवर आयात आणि निर्यातीवर तात्काळ बंदी घातली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

2 मे 2025 रोजी केंद्र सरकारने परराष्ट्र व्यापार धोरण 2023 अंतर्गत नवीन पॅरा 2.20A जाहीर करत ही बंदी लागू केली आहे. पाकिस्तानमधून थेट किंवा अप्रत्यक्षपणे येणाऱ्या किंवा तेथून निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयात किंवा वाहतुकीवर तात्काळ बंदी लागू करण्यात आली आहे. ही बंदी राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि सार्वजनिक धोरणाच्या हिताच्या दृष्टीने लागू करण्यात आली असून, याला अपवाद हवा असल्यास केंद्र सरकारची पूर्वपरवानगी आवश्यक राहील.

( नक्की वाचा : कोण आहेत PM मोदींचे 7 महारथी? जे लिहिणार पाकिस्तानच्या बरबादीची कहाणी )

त्यामुळे आता यापुढे कोणतीही वस्तू पाकिस्तानातून भारतात येणार नाही आणि भारतातून कोणतीही वस्तू पाकिस्तानला पाठवली जाणार नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारताने यापूर्वी थेट व्यापार बंद केला होता. पण आता सरकारने सर्व प्रकारचे अप्रत्यक्ष व्यापार देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाणिज्य मंत्रालयाने याबाबत एक अधिसूचना देखील जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, भारताने पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आयात-निर्यातीवर तात्काळ बंदी घातली आहे. 

Advertisement

(नक्की वाचा-  Pehalgam Terror Attack: भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानची भंबेरी, लष्करी युद्ध सरावाला सुरुवात)

भारत सरकारचा हा निर्णय पाकिस्तानसाठी मोठा धक्का आहे. वाणिज्य मंत्रालय आता अशा उत्पादनांची यादी देखील तयार करत आहे जे यापुढे भारतातून आयात किंवा निर्यात केले जाणार नाहीत.