जाहिरात

नूरखान, मुरीद ते चकलाला... भारतानं नष्ट केलेल्या पाकिस्तानच्या हवाई तळाचं महत्त्व काय? वाचा सर्व माहिती

नूरखान, मुरीद ते चकलाला... भारतानं नष्ट केलेल्या पाकिस्तानच्या हवाई तळाचं महत्त्व काय? वाचा सर्व माहिती
भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सुरक्षा कर्मचारी नूर खान एअरबेसची पाहणी करताना .... (फोटो - AFP)
मुंबई:

India Attack on Pakistan : भारताच्या एअरबेसना लक्ष्य करण्याच्या नादात असलेल्या पाकिस्तानला भारताचा एअर फोर्सनं, जशास तसं उत्तर दिले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा भारताच्या लढाऊ विमानांनी एअर स्ट्राईक करत... पाकिस्तानचे पाच विमानतळ उद्ध्वस्त केले. भारताच्या या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानचं रावळपिंडी (नूर खान एअरबेस ), चकवाल (मुरीद एअरबेस ),  शोरकोट (रफिकी एअरबेस), सेंट्रल पंजाबमधील (रहीमयार खान एअरबेस), सियालकोटमधील (सरगोधा एअरबेस) आणि इस्लामाबादमधील चकलाला एअरबेस नष्ट करण्यात आले आहे. 

पाकिस्तानचे हे सहा एअरबेस हे भारतीय हद्दीपासून केवळ 100 ते 300 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. प्रत्येक एअरबेसचं एक वेगळं महत्त्व आहे. हे महत्त्व काय आहे? भारतानं हल्ले करण्यासाठी याच एअरबेसची निवड का केली? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

नूरखान एअर बेस, रावळपिंडी

पाकिस्तानच्या लष्कराचं मुख्यालय असलेल्या रावळपिंडीमधील नूरखान एअरबेस भारतानं उद्धवस्त केलं आहे. हे एअरबेस व्हीआयपींच्या मूव्हमेंटसाठी वापरलं जातं. पाकिस्तानच्या पंतप्रधान तसंच राष्ट्रपतींची विमानं इथून टेकऑफ करतात. त्याचबरोबर पाकिस्तानी एअर ट्रान्सपोर्टचं मुख्यालय देखील इथच आहे.

India Pakistan Tension  'या' देशाच्या 400 ड्रोननं पाकिस्ताननं केला हल्ला, काय होता उद्देश? मोठी माहिती उघड

( नक्की वाचा : India Pakistan Tension 'या' देशाच्या 400 ड्रोननं पाकिस्ताननं केला हल्ला, काय होता उद्देश? मोठी माहिती उघड )

मुरीद एअरबेस, चकवाल

चकवाल जिल्ह्यातील हा एअरबेस ड्रोन ऑपरेशनचं केंद्र आहे. भारतात पाठवण्यात आलेले ड्रोन्स हे इथूनच पाठवले गेले होते.  शाहपार वन आणि बयाराख्तर टीबी टूच्या तुकड्या इथे तैनात असतात.

चकलाला एअरबेस, इस्लामाबाद

चकलालाचा एअरबेस हे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपासून फक्त 10 किलो मीटर अंतरावर आहे. हे पाकिस्तानी एअर फोर्सचं महत्त्वाचं केंद्र आहे 1965 आणि 1971 च्या युद्धात या एअरबेसचा मोठ्या प्रमाणात वापर झाला होता. विमानांच्या इंधनाचं पुनर्भरणाचं मोठं सेंटर इथं आहे. त्याचबरोबर नव्या पायलट्सना इथे ट्रेनिंग दिलं जातं.

रफिकी एअरबेस, शोरकोट

पाकिस्तानच्या अनेक विमानांचं हे घर आहे. जेएफ-17, मिराज अशी विमानं इथं तैनात असतात. जेएफ- 17, मिराज अशी विमानं इथं तैनात असतात. भारतावर झालेले एअरस्ट्राईक हे याच विमानतळावरुन झाले होते. सेंट्रल पंजाबमध्ये असलेलं हे विमानतळ पाकिस्तानसाठी सामरिकदृष्ट्या महत्वाचं होतं.

जळगावच्या जवानाला कडक सॅल्यूट! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आला फोन, तातडीनं झाला देशसेवेसाठी रवाना

( नक्की वाचा : जळगावच्या जवानाला कडक सॅल्यूट! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आला फोन, तातडीनं झाला देशसेवेसाठी रवाना )

रहीमयार खान एअरबेस

हा पंजाबच्या दक्षिणेला असलेला एअरबेस आहे. या एअरबेसचं लोकेशन पाकिस्तानसाठी महत्त्वाचं आहे. या विमानतळावरुनच राजस्थानला लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा डाव होता.

भारतानं हल्ला का केला?

पाकिस्ताननं भारताच्या एअरबेसवर हल्ल्याचा निष्फळ प्रयत्न केल्यानंतर भारतानं ही धडक कारवाई केली. पाकिस्तानने शुक्रवारी रात्री जम्मू, उधमपूर, पठाणकोट, श्रीनगर आणि बियास एअरबेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. 

पाकिस्तानी विमानांद्वारे आणि ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला. हा प्रत्येक हल्ला भारताने परतवून लावला. भारताच्या अँटी मिसाईल प्रणालीनं पाकिस्तानच्या मिसाईल्सच्या हवेतच चिंधड्या उडवल्या. पण हे करत असतानाही पाकिस्तानने प्रवासी विमानांची ढाल बनवण्याचा प्रयत्न केला.पाकिस्तानकडून लाहोरवरुन नागरी हवाई उड्डाणासाठी वापरण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय मार्गाचा दुरुपयोग केला जात आहे. पाकिस्तानी विमानांच्या हालचाली गुप्त ठेवण्यासाठी हे सुरु आहे. तसेच पाकिस्तानकडून भारताविरोधात अपप्रचार केला जात आहे, अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली. 

भारताच्या केवळ एका एअर स्ट्राईकने पाकिस्तानी एअरफोर्स कमकुवत झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान आणखी किती तग धरणार? हा प्रश्न आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com