Pakistan After Operation Sindoor : भारतीय लष्कराने बुधवारी पाकिस्तान आणि पीओकेमध्ये कार्यरत असलेले अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून केलेल्या या कारवाईत आतापर्यंत 70 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तोयबा सारख्या दहशतवादी संघटनांचे अड्डेही उद्ध्वस्त झाले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारताने या हल्ल्यानंतर पाकिस्तानला इशारा देखील दिला. "आम्ही फक्त दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला आहे, जर पाकिस्तानने कोणत्याही प्रकारची प्रत्युत्तरात्मक कारवाई केली तर आणि चोख उत्तर दिले जाईल. भारताच्या कडक कारवाईनंतर पाकिस्तानने नरमाईची भूमिका घेतली आहे. पाकिस्तान आता पूर्णपणे बॅकफूटवर आल्याचे दिसून येत आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानात झालेल्या कारवाईवर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं की, "आम्ही आमचे संरक्षण करण्यास समर्थ आहोत. जर भारताने पुढील कारवाई केली नाही तर आम्हीही काहीही करणार नाही. दोन्ही देशांमधील तणाव संपवण्यास तयार आहोत."
नक्की वाचा : 'ऑपरेशन सिंदूर'चं 26/11 हल्ला कनेक्शन; दहशतवादी कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डाही उद्ध्वस्त)
पाकिस्तानचा पहलगाम हल्ल्याच्या कटात सहभाग - परराष्ट्र सचिव
त्याआधी परराष्ट्र सचिन विक्रम मिसरी यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं की, पहलगाम हल्ल्याच्या तपासात पाकिस्तानचे संबंध समोर आले आहेत. साक्षीदार आणि इतर तपास यंत्रणांच्या आधारे हल्लेखोरांची ओळखही पटली आहे. पाकिस्तानचा या हल्ल्याच्या कटात सहभाग असल्याचे देखील पुरावे आहेत. पहलगाममधील हल्ल्यामुळे देशभरात आक्रोश पाहिला गेला.
(नक्की वाचा- Operation Sindoor : पाकिस्तानात 100 किमी आत घुसून बदला! हल्ल्यासाठी 'ती' 9 ठिकाणे का निवडली?)
भारताने या हल्ल्याननंतर पाकिस्तानसोबतच्या संबंधांबाबत कठोर पावले उचलले. मात्र त्यानंतरही पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. भारतावर यापुढेही दहशतवादी हल्ले होऊ शकतात. त्यामुळे भारताला कठोर पाऊल उचलणे गरजेचं होते, असं विक्रम मिसरी यांनी म्हटलं.