जाहिरात

Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'चं 26/11 हल्ला कनेक्शन; दहशतवादी कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डाही उद्ध्वस्त

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब आणि इतर दहशतवाद्यांनी ट्रेनिंग घेतलेलं ठिकाणीही या हल्ल्यात उद्ध्वस्त केल्याची माहिती मिळत आहे.

Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'चं 26/11 हल्ला कनेक्शन; दहशतवादी कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डाही उद्ध्वस्त

India vs Pakistan : भारताने पाकिस्तानात लपलेल्या दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. भारताने पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केलं. या हल्ल्यात 62 हून अधिक दहशतवादी मारले गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भारताने जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय आणि लश्कर ए तोयबाची ठिकाणे देखील उद्ध्वस्त केल्याची माहिती आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ऑपरेशन सिंदूरमध्ये 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब आणि इतर दहशतवाद्यांनी ट्रेनिंग घेतलेलं ठिकाणीही या हल्ल्यात उद्ध्वस्त केल्याची माहिती मिळत आहे. लाहोरपासून सुमारे 40 किमी अंतरावर असलेले मुरीदके हे लश्कर-ए-तोयबाचे मुख्यालय आहे. त्याला 'मरकज-ए-तैयबा' म्हणतात. 

(नक्की वाचा-  Operation Sindoor : पाकिस्तानात 100 किमी आत घुसून बदला! हल्ल्यासाठी 'ती' 9 ठिकाणे का निवडली?)

2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सर्व गुन्हेगार, ज्यात अजमल कसाबचाही समावेश आहे, त्यांना पाकिस्तानच्या आयएसआयने येथे प्रशिक्षण दिले होते. जैशच्या बहावलपूर मुख्यालयाप्रमाणे हे कॉम्प्लेक्स लश्करचे वैचारिक, लॉजिस्टिक आणि ऑपरेशनल सेंटर आहे. जिथे शेकडो दहशतवाद्यांना भरती करुन पाकिस्तान आणि काश्मीरमधून आणले जाते आणि दहशतवादी कारवायांसाठी प्रशिक्षित केले जातात. 

जवळपास 200 एकरमध्ये पसरलेले हे ठिकाण जगातील सर्वात मोठ्या दहशतवादी अड्ड्यांपैकी एक मानले जाते. 1980 च्या दशकात हाफिज सईदने आयएसआय आणि इतर निधीच्या मदतीने याची स्थापना केली होती.

(नक्की वाचा- Operation Sindoor: भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त; वाचा 10 मोठे अपडेट्स)

ऑपरेशन सिंदूर'मध्ये 62 दहशतवाद्यांचा मारले

भारतील सैन्याने बुधवारी 7 मे रोजी रात्री उशीरा पाकिस्तानाताली दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला चढवला. या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये 62 दहशतवादी मारले गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर ही कारवाई केली आहे. 1971 च्या युद्धानंतर भारताने पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशनमध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्त हल्ला केला.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com