धकाधकीच्या जिवनातून निवांत वेळ काढून फिरायला जाण्याचा आनंद काही औरच असतो. नेहमीच्या व्यापातून,ऑफिसच्या कामातून सुट्टी मिळाली की अनेकजण सहलीचा प्लॅन करतात. 2024 मध्ये भारतीयांनीही सहलींचा मनसोक्त आनंद लुटला आहे, ज्याचा खास रिपोर्ट आता समोर आला आहे. महत्त्वाचं म्हणजे या वर्षात भारतीयांनी देशातील विविध राज्यांसह परदेश दौऱ्याला सर्वाधिक पसंती दाखवली आहे.
ट्रॅव्हल- बँकिंग फिटनेस फ्लॅटफॉर्म निओ या कंपनीने भारतीयांच्या प्रवासावर खास अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार 2024 मध्ये भारतीयांनी
परदेश दौऱ्याला सर्वाधिक पसंती दर्शवली आहे. या अहवालामुळे भारतीयांची बदलती मानसिकता, परदेश दौरे आणि अनुभवानुसार फिरण्याला प्राधान्य
देत असल्याचं दिसत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अखेरच्या क्षणी बुकिंग अन् सहल....
या अहवालानुसार आणखी एक खास गोष्ट निदर्शानास आली आहे. ती म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक प्रवाशांनी अगदी शेवटच्या क्षणी म्हणजे फक्त एक आठवडाआधी नियोजन करुन ट्रीपचा आनंद लुटला आहे. अहवालानुसार, सुमारे 48% आंतरराष्ट्रीय उड्डाणे प्रवासापूर्वी 7 दिवसांच्या आत बुक करण्यात आली होती. जगातील 58 देश भारतीयांना त्यांच्या पासपोर्टवर मोफत व्हिसा किंवा व्हिसा-ऑन-अरायव्हल सुविधा देत आहेत. अशा सुविधांमुळे 'त्वरित बुकिंग,जलद प्रवास'या ट्रेंडला चालना मिळाली आहे. तसेच 30% व्हिसा अर्ज प्रवासाच्या 16-30 दिवस आधी सबमिट केले गेले होते.
दुबई प्रेम...
दुबई हे आतापर्यंत भारतीयांसाठी सर्वात आवडते ठिकाण आहे. उत्तम खरेदी आणि मनोरंजनासाठी ओळखल्या जाणाऱ्या दुबईने 45% पर्यटकांना आकर्षित केले. आवडत्या ठिकाणांच्या यादीत व्हिएतनाम दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. व्हिएतनामने सुमारे 15% प्रवासी आकर्षित केले. त्याच वेळी, सुमारे 1-1% प्रवाशांनी ओमान आणि जपानची निवड केली.
( नक्की वाचा : 'भारत जोडो' अभियानात शहरी नक्षलवाद्यांचा शिरकाव, RR पाटलांचा संदर्भ देत CM फडणवीसांचा खुलासा )
महिलांवर पॉप कल्चरचा प्रभाव
पॉप कल्चरचाही या वर्षी भारतीयांच्या विशेषत: महिलांच्या प्रवासाच्या पसंतीवर लक्षणीय परिणाम झाला. 'एमिली इन पॅरिस' सारख्या वेब सीरिजने अनेक भारतीय महिलांना फ्रान्सला भेट देण्याची प्रेरणा दिली. यापैकी 30% भारतीयांनी त्यांचे आवडते स्थान म्हणून फ्रान्सची निवड केली, त्यानंतर यूके (29%) आणि सिंगापूर (26%)ला पसंदी दर्शवली आहे.
पुरुषांचे आवडते 'थायलंड'
अहवालानुसार, पुरुषांसाठी पसंतीची प्रवासाची ठिकाणे वेगवेगळी आहेत. बहुतेक पुरुष थायलंडला गेले, 80% लोकांनी बीच सफरीचा आनंद लुटला आहे. थायलंड नंतर, UAE म्हणजेच सौदी अरेबिया अमिराती (77%) आणि अमेरिका (76%) क्रमवारीत होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world