Devendra Fadnavis on Bharat Jodo campaign : निवडणुका जिंकण्यासाठी आपण कोणत्या स्तरावर जात आहोत. देशाच्या निवडणुकामध्ये परकीय शक्तीचा हस्तक्षेप सुरु आहे. आमचे विरोधक दुसऱ्या कुणाला तरी खांदा देतायत, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देत होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो आंदोलनात शहरी नक्षलवाद्यांचा शिरकाव झाला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले फडणवीस?
भारत जोडो अभियान राहुल गांधी यांनी सुरु केलं. या अभियानात कोण आहे ते पाहा य नक्षलवाद्याच्या विरुद्ध एक लढाई सुरु झाली. सामान्य नक्षलवादी संपायला लागले. त्यावेळी नक्षलवादानं शहरामध्ये सेफ हेवन शोधण्यास सुरुवात केली. त्यांच्या अराजकतेचे विचार आमच्या मुलांमध्ये रुजवायचं काम सुरु झालं. 16 ते 27-28 वयात प्रत्येक गोष्ट माणूस नकारतो, तेवढी समज नसते. या वर्गाला काढून त्यांच्यात अराजकतेचं रोपण करायचं, त्याचं पॉप्युलर नाव हे अर्बन नक्षलीझम हे आहे.
संविधानाचं नाव घेऊन त्यांनी तयार केलेल्या प्रत्येक संस्थेवर संशय व्यक्त करायचा. लोकांना कोणतीही संस्थेवर विश्वास राहिला नाही की लोकं बंड करतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन अराजकतेचा प्रयत्न करायचा हा कट आहे.
( नक्की वाचा : Pankaja Munde : 'आता माझे पंचांग नीट होईल,' मंत्रिपदाची शपथ घेताच पंकजा मुंडे यांचं ते वक्तव्य चर्चेत )
2012 मध्ये गिरीश बापट यांनी नक्षवादाच्या संदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावेळी आर.आर. पाटील हे राज्याचे गृहमंत्री होते. आर.आर. पाटील यांनी उत्तरामध्ये जी नावं घेतली त्यामधील काही नावांचा भारत जोडो आंदोलनात सहभागी आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलंय.
ते कुणाचा तरी खांदा शोधायतात, तुम्ही खांदा देऊ नका. निवडणूक जिंकण्याकरता कोणाचा खांदा घेतो, त्याचा इतिहास काय याचा विचार केला पाहिजे, असं आवाहान त्यांनी केलं. 'भारत जोडो' मधील 140 पैकी 48 फ्रंटल ऑर्गनाय़धेशन काही संस्था त्यांची नोदं गृह विभागाने या संदर्भात रिपोर्ट सादर केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world