Railway Ticket Booking: रेल्वेच्या तिकिट बुकिंग नियमात 1 ऑक्टोबरपासून मोठा बदल; दलालांवर बसणार चाप

रेल्वे बोर्डाच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे तिकीट बुकिंगमध्ये अधिक पारदर्शकता येईल. तसेच, यामुळे दलाल आणि एजंट्सची मनमानी थांबेल आणि सामान्य प्रवाशांना सुरुवातीच्या वेळेत सीट मिळण्याची अधिक संधी मिळेल.

जाहिरात
Read Time: 2 mins

भारतीय रेल्वेने तिकिट बुकिंगच्या प्रक्रियेत एक मोठा बदल केला आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासून कोणत्याही ट्रेनच्या जनरल तिकीट बुकिंगची विंडो उघडल्यानंतर, सुरुवातीच्या 15 मिनिटांसाठी केवळ आधार-प्रमाणित युजर्सच (Aadhaar Authenticated Users) IRCTC च्या वेबसाइट किंवा ॲपवरून तिकीट बुक करू शकतील. हा नियम आतापर्यंत फक्त ‘तत्काळ तिकीट' बुकिंगसाठी लागू होता, पण आता तो सामान्य आरक्षणासाठीही लागू करण्यात येत आहे.

रेल्वे बोर्डाच्या म्हणण्यानुसार, या निर्णयामुळे तिकीट बुकिंगमध्ये अधिक पारदर्शकता येईल. तसेच, यामुळे दलाल आणि एजंट्सची मनमानी थांबेल आणि सामान्य प्रवाशांना सुरुवातीच्या वेळेत सीट मिळण्याची अधिक संधी मिळेल.

(नक्की वाचा-  Maharashtra Electric Bike Taxi Fare: दुचाकी टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित,जाणून घ्या किमान अन् कमाल भाडे)

नवीन नियम कसा काम करेल?

समजा, एखाद्या प्रवाशाला 15 नोव्हेंबर रोजी प्रवास करण्यासाठी 16 सप्टेंबर रोजी रात्री 12:20 वाजता तिकीट बुकिंग करायचे आहे, तर रात्री 12:20 ते 12:35 या 15 मिनिटांच्या वेळेत केवळ आधार-सत्यापित (Aadhaar-Verified) खात्यातूनच तिकीट बुक करता येईल. ज्यांच्याकडे आधार प्रमाणीकरण नाही, त्यांना या महत्त्वपूर्ण 15 मिनिटांच्या कालावधीत बुकिंग करता येणार नाही, कारण याच काळात मागणी सर्वाधिक असते.

(नक्की वाचा-  Samruddhi Mahamarg: 'मर्सिडीझ बेंन्ज'ने समृद्धी महामार्ग का घेतला दत्तक? वाचा सविस्तर)

सणांच्या आणि लग्नसराईच्या काळात ट्रेनच्या तिकिटांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे सामान्य बुकिंगमध्येही ‘तत्काळ बुकिंग'सारखीच गर्दी होते. या नवीन आधार-आधारित नियमामुळे बुकिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक होऊन, व्यस्त वेळेतील गैरव्यवहार थांबवण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

Advertisement