जाहिरात

Indian Railways RailOne App: रेल्वेने आणले जबरदस्त App, काय आहे याची खासियत ?

Indian Railways RailOne App: हे अ‍ॅप iOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Indian Railways RailOne App: रेल्वेने आणले जबरदस्त App, काय आहे याची खासियत ?
मुंबई:

भारतीय रेल्वेने एक नागरिकांसाठी एक नवी सेवा उपलब्ध करून दिली आहे. RailOne app नावाने एक अ‍ॅप सुरू करण्यात आले असून याद्वारे असंख्य सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे अ‍ॅप iOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. IRCTC किंवा अशाच प्रकारच्या वेबसाईट अथवा अ‍ॅपवरून ज्या सुविधा प्रदान केल्या जातात तशाच प्रकारच्या सुविधा या अ‍ॅपद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र या अ‍ॅपमधील सेवा आणि IRCTC च्या सेवा यामध्ये मोठा फरक हा आहे की रेल वन अ‍ॅपमध्ये अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून ते वापरण्यासाठीही सोपे आहे. 

(नक्की वाचा: रेल्वे प्रवाशांनी लक्ष द्या! आता 8 तासांपूर्वी तयार होणार आरक्षण यादी, तत्काळ तिकीटांच्या नियमांमध्येही बदल)

या अ‍ॅपद्वारे कोणकोणत्या सेवा मिळणार ?

  1. आरक्षित आणि अनारक्षित तिकीटे काढता येणार
  2. प्लॅटफॉर्म तिकीट काढता येणार
  3. ट्रेनसंदर्भातील चौकशी करता येणार
  4. पीएनआरची माहिती मिळवता येणार
  5. प्रवासाचे नियोजन करता येणार
  6. 'रेल मदद' सेवेचा लाभ घेता येणार
  7. गाडीत बसून खाणं मागवता येणार

(नक्की वाचा: कोकण रेल्वेची तिकिटे दोन मिनिटात हाऊसफुल, चाकरमान्यांची निराशा )

RailOne ॲप वापरण्यासाठी सोपे 

या ॲपचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी 'सिंगल साइन-ऑन' (Single Sign-On) सुविधा देण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना वेगवेगळे पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज भासणार नाही. ज्या प्रवाशांकडे आधीपासून 'RailConnect' किंवा 'UTS on Mobile' ॲपचे युजर आयडी आहेत, ते त्याच आयडीने 'RailOne' ॲपमध्ये लॉग इन करू शकतात. यामुळे वेगवेगळ्या सेवांसाठी वेगवेगळे ॲप्स बाळगण्याची गरज नाही.

R-Wallet मुळे पटकन तिकीट बुकींग करता येणार

या ॲपमध्ये 'आर-वॉलेट' (Railway e-wallet) ची सुविधाही देण्यात आली आहे. तसेच, ॲप वापरासाठी अधिक सुरक्षित व्हावे यासाठी त्यात mPIN आणि बायोमेट्रिक लॉग इन सारखे सिक्युरिटी लेअर देण्यात आले आहेत. या ॲपमध्ये लॉगिन लवकर लॉग इन करता येते आणि ही प्रक्रिया सोपी देखील आहे. ज्यांच्याकडे साइन इन करण्यासाठी युजर नेम पासवर्ड नाही ते मोबाईल नंबर आणि ओटीपी (OTP) वापरून 'गेस्ट लॉग इन' (Guest Login) द्वारेही ॲपचा वापर करू शकतात.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com