
Indian Railway General Ticket Rules: देशभरात कोट्यवधी प्रवाशी रोज रेल्वेनं प्रवास करतो. सर्व आर्थिक स्तरातील नागरिकांना परवडणारं रेल्वे हे माध्यम आहे. काही जण त्यांच्या बजेटनुसार रिझर्व्ह कोचमध्ये (Reserve Coach) प्रवास करतात. तर काही जण अनारक्षित कोच (Unreserved Coach) मधून प्रवास करतात.
आरक्षित कोचमधून प्रास करण्यासाठी तिकीट पहिल्यांदाच बुक करावं लागतं. यामध्ये फर्स्ट AC, सेकेंड AC, थर्ड AC, AC चेयर कार, स्लीपर आणि सेकंड सिटींग असे पर्याय आहेत. तर अनारक्षित कोचमध्ये जनरल कोचचा समावेश होतो.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जनरल कोचच्या तिकीटांमध्ये होणार बदल
जनरल कोचमधून प्रवास करण्यासाठी तुम्हाला आगोदरासून तिकीट खरेदी करण्याची गरज नसते. तुम्ही थेट रेल्वे स्टेशनला जाऊन जनरल तिकीट खरेदी करुन रेल्वेनं प्रवास करु शकता. रोज मोठ्या संख्येनं प्रवासी या पद्धतीनं जनरल डब्यातून प्रवास करतात.
पण, आता रेल्वे प्रशासन जनरल तिकीटांच्या नियमात बदल करण्याचा विचार करत आहे. त्याचा परिणाम कोट्यवधी प्रवाशांवर होणार आहे. तर पाहूया रेल्वेच्या जनरल तिकीटांमध्ये काय बदल होणार आहे? त्याचा प्रवाशांवर काय परिणाम होऊ शकतो.
( नक्की वाचा : Indian Railway: रेल्वेत ज्येष्ठ नागरिकांना कन्फर्म मिळणार लोअर सीट! 'या' पद्धतीनं करा बुकिंग )
काही दिवसांपूर्वी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर रेल्वे प्रशासन जनरल तिकीटांची पद्धत आणखी सुरळीत करण्यासाठी नवी योजना तयार करत आहे.
सध्या जनरल तिकीट घेऊन प्रवास करणारे प्रवासी सहजपणे रेल्वे बदलू शकतात. येत्या काळात जनरल तिकीटांवर रेल्वेचं नाव येऊ शकतं. त्यामुळे प्रवासी तिकीटावर नाव नसलेल्या रेल्वेतून प्रवास करु शकणार नाहीत.
रेल्वेकडून दिल्या जाणाऱ्या जनरल तिकीटाला कालमर्यादा (Validity of General Ticket) असते. रेल्वेच्या नियमानुसार जनरल तिकीटाची मुदत फक्त तीन तास असते. याचाच अर्थ तुम्ही तिकीट घेतल्यानंतर तीन तासांच्या आत प्रवास सुरु केला नाही तर ते तिकीट रद्द किंवा गैरलागू होतं. त्यामुळे तुम्ही रेल्वेचं जनरल तिकीट घेतल्यानंतर प्रवास करु शकत नाही.
रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा सुरक्षित आणि अधिक आरामदायी व्हावा यासाठी जनरल तिकीटांच्या नियमांमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्थात नव्या नियमांची अधिकृत घोषणा रेल्वे प्रशासनाकडून लवकरच केली जाऊ शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world