देशातील सर्वात मोठी इंडिगो एअरलाइन सध्या प्रवाशांसाठी एक मोठा मनस्ताप बनली आहे. दोन वर्षांपूर्वी सरकारने जाहीर केलेल्या नवीन विमान सुरक्षा नियमांमुळे इंडिगोला शेकडो विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली. यानंतरही अनेक विमानांना विलंब होत आहे किंवा ती रद्द केली जात आहेत.
इंडिगोच्या 'सॉरी किट'ची चर्चा
इंडिगोमुळे उडालेल्या गोंधळानंतर ताटकळत बसलेल्या प्रवाशाने कंपनीने पॅकिंग फूट दिलं आहे. एका प्रवाशाने एअरलाइनने दिलेल्या 'सॉरी किट'चा (Apology Token) व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. @babyaaira.gaurav नावाच्या इन्स्टाग्राम पेज युजरने सांगितले की, त्यांचे इंडिगो विमान 9 तासांहून अधिक काळ उशीराने होते.
सॉरी किटमध्ये काय मिळालं?
एअरलाइनने दिलेल्या किटमध्ये एका लहान निळ्या बॅगेत काही खाण्याच्या वस्तू आहेत. प्रवाशाने या बॅगेचा अनबॉक्सिंग व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये गॉरमेट पॉपकॉर्न (Gourmet Popcorn), मेथी मठरी (Methi Mathri), मिक्स फ्रूट ज्यूसचा एक पाऊच आणि शेवटी एक सॅमसंग कार्ड मिळाले.
इंडिगो विमानसेवेची सद्यस्थिती
नागरी उड्डाण मंत्री यांनी कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनातील त्रुटींसाठी थेट इंडिगोला जबाबदार धरले आहे. भारताच्या विमान वाहतूक नियामक संस्थेने, डीजीसीएने शनिवारी एअरलाइनला पत्राद्वारे खडसावले. पत्रात, 'विश्वासार्ह ऑपरेशन्ससाठी वेळेवर व्यवस्था सुनिश्चित करण्यात तुम्ही अपयशी ठरला आहात,' असे म्हटले आहे.
इंडिगोने 8 डिसेंबर 2025 रोजी 610 कोटी रुपयांचे तिकीट रिफंड जमा केले आहेत. तसेच, 15 डिसेंबरपर्यंतच्या बुकिंगसाठी रद्द आणि पुनर्निर्धारित करण्याच्या विनंत्यांवर पूर्ण सूट देण्याचे आश्वासन दिले आहे. इंडिगोचे अधिकारी लवकरच त्यांची ऑपरेशन्स पूर्ववत होतील, याबद्दल आशावादी आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world