मेघालया: शिलाँगमध्ये हनिमूनसाठी गेलेल्या राजा रघुवंशीची हत्या त्याच्याच पत्नीच्या कटातून झाल्याचे आता उघडकीस आले आहे. राजा आणि त्याच्या कुटुंबाने स्वप्नातही कल्पना केली नसेल की निष्पाप दिसणारी सोनम इतकी धूर्त असू शकते. सोनम आणि तिला साध देणाऱ्या आरोपींनी केलेल्या क्रुर कृत्याचे नवनवे कट आता उघडकीस येत आहेत. अशातच आता या प्रकरणात आता आणखी एका आरोपीची एन्ट्री झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हत्याकांडात नव्या आरोपीची एन्ट्री..
राजा रघुवंशी हत्याकांडात आतापर्यंत सोनमसह पाच आरोपी होते. पण आता सहाव्या आरोपीचा समावेश असल्याचेही समोर येत आहे. त्याचे नाव जितेंद्र रघुवंशी आहे. त्याचे सोनमचा प्रियकर राज कुशवाहाशी विशेष संबंध आहेत. पोलीस आता जितेंद्र रघुवंशीचा शोध घेत आहेत. असे म्हटले जात आहे की राज आणि जितेंद्र दोघेही एकत्र हवाला व्यवसाय चालवत होते. इतकेच नाही तर पोलिसांना जितेंद्रच्या नावावर चार बँक खाती सापडली आहेत. ही सर्व चालू खाती देवास येथील रहिवासी जितेंद्र रघुवंशी यांच्या नावावर आहेत. ज्यामध्ये लाखोंचे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला आहे.
मेघालयाचे डीजीपी आय नोंगरांग म्हणाले की, राजा रघुवंशी आणि त्यांची पत्नी सोनम बेपत्ता होण्यापूर्वी हे जोडपे सोहरा येथील 'होमस्टे'मध्ये त्यांची सुटकेस सोडले होते आणि सुटकेसमध्ये सापडलेल्या मंगळसूत्र आणि अंगठीमुळे हे खून प्रकरण उलगडण्यास मदत झाली. सोनमचे मंगळसूत्र आणि अंगठी सोहरा येथील 'होमस्टे'मध्ये सोडलेल्या सुटकेसमधून सापडली.
राजा रघुवंशीच्या मृत्यूची भविष्यवाणी करणाऱ्या पंडितजींनी केले आणखी अनेक धक्कादायक खुलासे
मंगळसूत्र हा विवाहित महिलांनी गळ्यात घालण्याचा एक दागिना आहे, जो त्यांच्या पतीसोबतच्या त्यांच्या बंधनाचे प्रतीक मानला जातो. दोघांनी ११ मे रोजी इंदूरमध्ये लग्न केले आणि २० मे रोजी, दोघेही हनिमूनसाठी आसाममधील गुवाहाटीमार्गे मेघालयात पोहोचले. २३ मे रोजी पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील सोहरा येथील नोंगरियाट गावात 'होमस्टे' सोडल्यानंतर काही तासांनी दोघेही बेपत्ता झाले. सोनमचे मंगळसूत्र या प्रकरणात एक मोठा सुगावा ठरला.
काय होती सोनमची अट
सोनमने तिचा पती राजाने जवळीक साधू नये म्हणून एक अट घातली होती. पोलिस तपासात असे दिसून आले आहे की सोनमने तिचा पती राजा रघुवंशीला सांगितले होते की ती गुवाहाटीतील कामाख्या मंदिरात पूजा केल्यानंतरच त्याच्याशी शारिरिक संबंध ठेऊन वैवाहिक जिवनाला सुरुवात करेल. त्यामुळेच राजाने हनिमूनसाठी गुवाहाटी आणि जवळच्या मेघालयला जाण्याचा प्लॅन आखला होता, तर सोनमने कटाचा भाग म्हणून त्याला तिथे नेले होते. तिथे तिने तिच्या प्रियकरासोबत मिळून त्याला मारण्याचा कट रचला.