जाहिरात

राजा रघुवंशीच्या मृत्यूची भविष्यवाणी करणाऱ्या पंडितजींनी केले आणखी अनेक धक्कादायक खुलासे

Raja Raghuvanshi Murder Case: पंडित अजय दुबे यांनी सांगितले की, राजा रघुवंशीच्या कुटुंबियांनी संपर्क साधला होता. त्यानंतर प्रश्न कुंडलीनुसार मी त्यांना सांगितले की, राजा आता या जगात नाही.

राजा रघुवंशीच्या मृत्यूची भविष्यवाणी करणाऱ्या पंडितजींनी केले आणखी अनेक धक्कादायक खुलासे
Raja Raghuvanshi Murder Case : पंडित दुबे यांनी प्रश्न कुंडलीच्या माध्यमातून भविष्यवाणी केली होती.
मुंबई:

Raja Raghuvanshi Murder Case: राजा रघुवंशीच्या हत्येचं प्रकरण आता सगळ्यांसमोर आली आहे. पण काही दिवसांपूर्वीपर्यंत, हनिमूनवर गेलेले राजा आणि त्याची पत्नी सोनम यांच्या बेपत्ता होण्याचे प्रकरण इतके गुंतागुंतीचे होते की, दोन राज्यांची पोलीस आणि सरकार दिवसरात्र प्रयत्न करूनही कोणताही सुगावा मिळत नव्हता. 

अनेक दिवसांपर्यंत राजा रघुवंशीच्या कुटुंबियांना कुठूनही काही माहिती न मिळाल्याने, ते थकले आणि पंडित अजय दुबे यांच्या आश्रयाला गेले. त्यांनी सगळ्या अडचणी सांगितल्यानंतर दुबे यांना या प्रकरणात मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती.  त्यावर दुबे यांनी प्रश्न कुंडलीच्या माध्यमातून सांगितले होते की, राजा रघुवंशी आता या जगात नाही. विशेष म्हणजे राजाचा मृतदेहही सापडला नव्हता त्यावेळी दुबे यांनी ही भविष्यवाणी केली होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

राजाच्या हत्येची भविष्यवाणी करणाऱ्या पंडितजींशी खास बातचीत

 राजाचा मृतदेह हजारो किलोमीटर दूर एका खोल दरीत पडला होता, ज्याची माहिती हत्या आणि त्या कटात सामील असलेल्या लोकांव्यतिरिक्त कोणालाही नव्हती. पण इंदूरमध्ये बसलेल्या पंडित दुबे यांनी प्रश्न कुंडलीच्या माध्यमातून हे सांगितले की राजा आता जिवंत नाही. बुधवारी NDTV नं पंडित अजय दुबे यांना गाठलं. त्यांच्याशी खास बातचीत केली. NDTV शी बोलताना पंडित अजय दुबे यांनी या प्रकरणाशी संबंधित आणखी अनेक धक्कादायक खुलासे केले.

( नक्की वाचा : Sonam Raghuvanshi : सर्वांसमोर भैय्या, पाठीमागे सैया! सोनम आणि राजचं अफेयर कसं सुरु झालं? )
 

सोनमबद्दल काय सांगितले होते?

पंडित अजय दुबे म्हणाले, राजा रघुवंशीच्या कुटुंबियांनी संपर्क साधला होता. त्यानंतर प्रश्न कुंडलीनुसार मी त्यांना सांगितले की, राजा आता या जगात नाही. यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी सुनेबद्दल विचारले होते. तेव्हा मी सांगितले होते की, सून सुखरूप आहे. ती पूर्व आणि उत्तर दिशेने असू शकते. मी सांगितल्यानुसारच काही दिवसांनी राजाच्या हत्येची बाब समोर आली. त्यानंतर मी सांगितलेल्या दिशेनेच सोनम सापडली.

पंडित अजय दुबे यांनी हे देखील सांगितले की, सोनमला मंगळ दोष आहे. जोपर्यंत तिचा मंगळ दोष दूर केला जाणार नाही, तोपर्यंत तिच्यासोबत अशाच घटना घडतील. पंडितजींनी हे देखील सांगितले की, सोनमचे दुसरे लग्न झाले तरी तेच होईल, हे तिने केले नाही तर दुसरे कोणीतरी करेल. यासाठी सोनमच्या कुटुंबियांना काही पूजा करावी लागेल.

( नक्की वाचा : Raja Raghuvanshi : 'माझी बहीण गुन्हेगार' राजाच्या आईचे पाय धरत सोनमच्या भावाचा मोठा निर्धार )
 

आणखी एक महिला आणि 3-4 जण...

पंडितजींनी यावेळी म्हणाले की, माझ्या प्रश्न कुंडलीत हे समोर आले की या संपूर्ण प्रकरणात 8-10 लोक सामील असू शकतात, ज्यात दोन महिला असतील. सोनमच्या रूपात एक महिला सापडली आहे. तसेच राज कुशवाहा सहित तीन भाडोत्री मारेकरी सापडले आहेत. पंडितजींनी हे देखील सांगितले की, या प्रकरणात अजून एक महिला सहित 3-4 लोक आणखी समोर येतील.

पंडितजींनी हे देखील सांगितले की, संपूर्ण प्रकरणाचे सत्य समोर यायला किमान एक महिना अजून लागेल. त्यांनी हे देखील सांगितले की आम्ही राजाच्या आत्म्याच्या शांतीसाठी शांतीपाठ केला आहे. राजाच्या आत्म्याला शांती मिळेल.

स्पष्टीकरण- या बातमीतील सर्व माहिती पंडित दुबे यांनी सांगितल्या आहेत. NDTV अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही.
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com