- हार्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये युद्धामुळे अनेक जहाज अडकले असून त्यात भारतीय एलपीजी वाहतूक करणारे जहाजही आहे
- मुंबईतील दहिसर येथील कॅप्टन वीरेंद्र विश्वकर्मा आणि ३३ सहकारी जहाजावर अडकले आहेत
- युद्धामुळे जहाज हलू शकत नसून क्षेपणास्त्रे, ड्रोन हल्ले होत असून भारतीय नौदलाच्या मदतीची गरज आहे
इराण इस्त्रायल युद्धामुळे हार्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये अनेक बोटी अडकून पडल्या आहेत. त्यात भारतीय बोटींचाही समावेश आहे. त्यावर भारतीय रहीवाशी आहे. मुंबईतील दहिसर येथील रहिवासी असलेले कॅप्टन वीरेंद्र विश्वकर्मा गेल्या अनेक दिवसांपासून 'Strait of Hormuz' (हॉर्मुजची सामुद्रधुनी) भागात आपल्या 33 सहकाऱ्यांसह अडकले आहेत. ज्या जहाजाची कमान वीरेंद्र यांच्याकडे आहे. त्यात 36 लाख घरगुती गॅस सिलिंडर भरता येतील इतकी प्रचंड प्रमाणात एलपीजी (LPG) आहे. मात्र युद्धामुळे त्यांनी तिथून हलता येत नाही अशी स्थिती झाली आहे.
हे जहाज कुवेतच्या 'मीना अल अहमदी' बंदरावरून गुजरातच्या 'दीनदयाल कांडला' बंदराकडे निघाले होते. मात्र 28 फेब्रुवारीपासून या मार्गावरील निर्बंधांमुळे जहाजाची गती थांबली आहे. सध्या हे जहाज युएई (UAE) जवळील 'मीना सक्र' बंदर परिसरात उभे आहे. कॅप्टन वीरेंद्र यांनी पाठवलेल्या संदेशानुसार, तिथली परिस्थिती अत्यंत भीषण आहे. जहाजाच्या वरून क्षेपणास्त्रे आणि ड्रोन जात असून सतत सायरनचे आवाज येत आहेत. "आम्ही मृत्यूच्या सावटाखाली आहोत. आम्ही भारतीय नौदलाच्या मदतीची वाट पाहत आहोत," अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
दहिसरमध्ये राहणारी त्यांची पत्नी नील्पा, 10 वर्षांचा मुलगा वेदांश आणि 12 वर्षांची मुलगी निर्वी आपल्या वडिलांच्या सुरक्षिततेसाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत. इंटरनेटअभावी संपर्क होणे कठीण झाले आहे. जहाजावर सध्या 60 दिवसांचे रेशन शिल्लक आहे. शिपिंग कंपनी 'GESCO' आणि संबंधित मंत्रालय भारतीय नौदलाच्या संपर्कात असून, या 34 भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
जहाजावर केवळ 60 दिवसांचे जेवण उरले आहे. आता केवळ भारतीय नौदलच आपल्याला या संकटातून वाचवू शकते, अशी आशा कॅप्टननी व्यक्त केली आहे. 'GESCO' कंपनी आणि सरकार यावर लक्ष ठेवून असून लवकरात लवकर या 34 भारतीयांची सुटका व्हावी, हीच संपूर्ण देशाची इच्छा आहे. कॅप्टन यांची 10 आणि 12 वर्षांची मुले वडिलांच्या परतीची वाट पाहत आहेत. "आम्ही फक्त भारतीय नौदलाच्या संरक्षणाची वाट पाहत आहोत," असा संदेश कॅप्टननी पाठवला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world