जाहिरात

इस्लाममध्ये महिलांना मशीद प्रवेशास बंदी नसते; तरीही महिला का जात नाहीत? मोहम्मद पैगंबरांचे निर्देश काय होते?

मुस्लीम महिला मशिदीत जाताना दिसत नाही. त्यामुळे अनेकांचा असा समज असतो की, इस्लाममध्ये मशिदीत महिलांना बंदी असते. मात्र प्रत्यक्षात याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

इस्लाममध्ये महिलांना मशीद प्रवेशास बंदी नसते; तरीही महिला का जात नाहीत? मोहम्मद पैगंबरांचे निर्देश काय होते?

Muslim Women's Entry into Mosques : भारतातील मशि‍दींमध्ये दररोज मोठ्या संख्येने पुरुष नमाज अदा करण्यासाठी जात असतात. मात्र कधीच महिला आपल्याला मशिदीत जाताना दिसत नाही. त्यामुळे अनेकांचा असा समज असतो की, इस्लाममध्ये मशिदीत महिलांना बंदी असते. मात्र प्रत्यक्षात याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, महिलांना मशिदीत नमाज पढण्यास जाण्यावर कोणतीही बंदी नाही. दरम्यान मुस्लीम लॉ बोर्डाच्या विधानाची सध्या देशभरात चर्चा सुरू झाली आहे. जर इस्लाममध्ये महिलांना मशिदीत जाण्याची परवानगी आहे, तरीही महिला नमाज पढण्यासाठी मशिदीत का जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महिलांचे मूलभूत अधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या संतुलनावर सर्वोच्च न्यायालयात आज २४ एप्रिल रोजी सुनावणी झाली. सीजेआय सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली नऊ न्याय‍ाधीशांच्या खंडपीठाचे सदस्य अहसानुद्दीन अमानुल्लाह यांनी गुरुवारी सांगितलं की, सर्वांना हे माहीत असणं आवश्यक आहे की, मोहम्मद पैगंबर यांच्या वेळेपासून महिलांना मशिदीत प्रवेश करण्यास कोणतीही बंदी नव्हती. त्यांनी स्पष्ट केलं की, इस्लाममध्ये अशा प्रक्रिया, चालीरीती आणि परंपरा आहेत ज्यामुळे नमाज पठण करण्याच्या पद्धती नियंत्रण येतं.

मुस्लीम महिला मशिदीत का जात नाहीत? l Why do Muslim women do not go to mosques?

न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह यांनी सांगितलं की, इस्लाममध्ये महिलांना घरात नमाज अदा करण्यास प्राथमिकता देण्यामागील एक कारण आहे. जर कुटुंबातील सर्व मोठी माणसं नमाज अदा करण्यासाठी मशिदीत गेली तर लहान मुलांचा सांभाळ कोण करेल?

याचिकांवर उत्तर देताना ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे शमशाद यांनी सांगितलं की, मशिदीत गर्भगृहाचा कोणताही कॉन्सेप्ट नसतो, जो दरगाहमध्ये असतो. ते पुढे म्हणाले, इस्लाममधील सर्व संप्रदायांमध्ये महिलांच्या मशीद प्रवेशावर बंदी नाही. मात्र महिलांना नमाज पढणाऱ्या समुदाचा भाग होणं आवश्यक नसल्याच्या मुद्द्यावर संमती असल्याचं सांगितलं.

प्रेषित मोहम्मद पैगंबर साहब यांचं काय म्हणणं होतं?

या मुद्दावर बोलताना ज्येष्ठ वकील म्हणाले, मोहम्मद पैगंबर साहब यांनी स्वत: सांगितलं होतं की, महिलांना मशिदीत येण्यापासून रोखू नका. यावर स्पष्टता आहे. आणि ज्या लोकांनी अनेक खंडांमध्ये हदीस (प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची वचनं, कृती, आचरण आणि मूक संमतीचा संग्रह) लिहिली आहे, त्यातील अनेकांनी ही बाब अधोरेखित केली की, पैगंबरांनी निर्देश दिले होते की, महिलांनी मशिदीत येण्यापासून थांबवू नये.

ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे शमशाद म्हणाले की, पुरुषांसाठी जमातचा (नमाज करणाऱ्यांचा समूह) भाग होणं अनिवार्य आहे. तर महिलांसाठी ही बाब अनिवार्य नाही.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com