आयोध्येतलं राम मंदिर उडवण्याच्या धमकीने एकज खळबळ उडाली आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने राम मंदिर उडवण्याची धमकी दिली आहे. या धमकीनंतर तपास यंत्रणा अॅक्टिव्ह झाल्या असून अयोध्येत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राम मंदिर उडवण्याच्या पार्श्वभूमीवर तेथील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय विमानतळ आणि इतर प्रमुख ठिकाणांवरील सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुरक्षेचा आढावा घेतला आहे.
(ट्रेंडिंग बातमी- योगी आदित्यनाथ - मोहन भागवत भेटीचं काय आहे महत्त्व?)
#WATCH उत्तर प्रदेश: अयोध्या SSP राजकरण नय्यर ने कहा, "आगामी त्योहारों के संबंध में संबंधित हितधारकों के साथ पीस कमेटी के साथ बैठक कर ली गई है, दिशा-निर्देशों से सभी को अवगत करा दिया गया है... अयोध्या धाम की सुरक्षा की बात करें तो पूरे क्षेत्र को हमने विभिन्न इलाकों में विभाजित… pic.twitter.com/ym3NEszSVC
— ANI_HindiNews (@AHindinews) June 14, 2024
ऑडिओ क्लिपद्वारे धमकी
मिळालेल्या माहितीनुसार, धमकीची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. धमकी देणाऱ्याने आपले नाव आमीर सांगितले असून तो जैश ए मोहम्मदचा दहशतवादी असल्याचे सांगत आहे. आमची मशिद हटवून राम मंदिर बांधलं गेले. आता राम मंदिर बॉम्बने उडवलं जाणार. आमचे तीन साथी कुर्बान झाले, आता राम मंदिर पाडावचं लागेल, अशा धमकीची ही ऑडिओ क्लिप आहे.
ट्रेंडिंग बातमी - ... म्हणून लोकसभा निवडणुकीत BJP ला फटका, RSS च्या मुखपत्रानं टोचले भाजपाचे कान
याआधीही राम मंदिर उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. गेल्या वर्षीही अशीच धमकी मिळाली होती. जैश ए मोहम्मदच्या नावाने ही धमकी आल्याने पोलीस सतर्क झाले आहेत आणि परिसरातील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world