केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत गोरखपूरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांचे 16 जूनपर्यंत गोरखपूरमध्ये कार्यक्रम आहेत. या दरम्यान त्यांची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी होऊ शकते. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या निराशाजनक कामगिरीनंतर या संभाव्य भेटीचं महत्त्व वाढलं आहे. यापूर्वी भागवत यांनी सोमवारी नागपूरमध्ये भाजपानं नाव न घेता सुनावलं होतं. त्यांनी मणिपूरचा मुद्दा देखील उपस्थित केला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भागवत यांचा काय आहे कार्यक्रम?
सरसंघचालक मोहन भागवत बुधारी दुपारी गोरखपूरमध्ये दाखल झाले आहेत. गोरखपूरमध्ये कार्यकर्ता विकास वर्ग (संघ शिक्षा वर्ग) सुरु आहे. वेगवेगळ्या वयोगटातील कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी हा वर्ग होतोय. 3 जून रोजी सुरु झालेला हा वर्ग 23 जूनपर्यंत चालणार आहे. मोहन भागवत या कालावधीत कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. या प्रशिक्षण वर्गाच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी देखील सहभागी होण्याची शक्यता आहे.
भागवत यांची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी भेट होऊ शकते. उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या कामगिरीनंतर ही भेट महत्त्वाची मानली जाते. या भेटीमध्ये लोकसभा निवडणुकीतील भाजपाची कामगिरी तसंच उत्तर प्रदेश सरकारच्या कामकाजाबाबतही चर्चा होऊ शकते. भागवत यांनी नागपूरमध्ये दिलेल्या सल्ल्यानंतर त्यांची आणि योगी आदित्यनाथ यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. विशेषत: उत्तर प्रदेशमधील भाजपात्या पराभवानंतर या भेटीला मोठं महत्त्व आलंय.
ट्रेंडींग बातमी - ... म्हणून लोकसभा निवडणुकीत BJP ला फटका, RSS च्या मुखपत्रानं टोचले भाजपाचे कान
उत्तर प्रदेशातील भाजपाची कामगिरी
गेल्या दोन लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या दमदार कामगिरीमध्ये उत्तर प्रदेशचा मोठा वाटा होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि सहकारी पक्षांनी 80 पैकी 73 जागा जिंकल्या होत्या. 2019 च्या निवडणुकीत 64 जागा जिंकल्या. तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला फक्त 33 जागा मिळाल्या. या पराभवामुळेच लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळालायला भाजपाला अपयश आलं. एनडीएतील मित्रपक्षांच्या पाठिंब्यानं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world