"राम मंदिर उडवणार", जैश-ए-मोहम्मदच्या धमकीने खळबळ

Bomb Threat to Ram Mandir : राम मंदिर उडवण्याच्या पार्श्वभूमीवर तेथील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय विमानतळ आणि इतर प्रमुख ठिकाणांवरील सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

आयोध्येतलं राम मंदिर उडवण्याच्या धमकीने एकज खळबळ उडाली आहे.  जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने राम मंदिर उडवण्याची धमकी दिली आहे. या धमकीनंतर तपास यंत्रणा अॅक्टिव्ह झाल्या असून अयोध्येत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राम मंदिर उडवण्याच्या पार्श्वभूमीवर तेथील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय विमानतळ आणि इतर प्रमुख ठिकाणांवरील सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुरक्षेचा आढावा घेतला आहे. 

(ट्रेंडिंग बातमी- योगी आदित्यनाथ - मोहन भागवत भेटीचं काय आहे महत्त्व?)

ऑडिओ क्लिपद्वारे धमकी

मिळालेल्या माहितीनुसार, धमकीची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. धमकी देणाऱ्याने आपले नाव आमीर सांगितले असून तो जैश ए मोहम्मदचा दहशतवादी असल्याचे सांगत आहे. आमची मशिद हटवून राम मंदिर बांधलं गेले. आता राम मंदिर बॉम्बने उडवलं जाणार. आमचे तीन साथी कुर्बान झाले, आता राम मंदिर पाडावचं लागेल, अशा धमकीची ही ऑडिओ क्लिप आहे.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - ... म्हणून लोकसभा निवडणुकीत BJP ला फटका, RSS च्या मुखपत्रानं टोचले भाजपाचे कान

याआधीही राम मंदिर उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. गेल्या वर्षीही अशीच धमकी मिळाली होती. जैश ए मोहम्मदच्या नावाने ही धमकी आल्याने पोलीस सतर्क झाले आहेत आणि परिसरातील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.

Topics mentioned in this article