जम्मू-काश्मीरमध्ये तीन दिवसात तिसरा दहशतवादी हल्ला, डोडामधील लष्कराची चौकी निशाण्यावर

जम्मू-काश्मीरच्या डोडा भागात 11 जून रोजी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी लष्कराच्या चौकीवर हल्ला केला.

जाहिरात
Read Time: 1 min
जम्मू-काश्मीर:

जम्मू-काश्मीरच्या डोडा भागात 11 जून रोजी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी लष्कराच्या चौकीवर हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार अद्यापही दहशतवादी आणि सुरक्षारक्षकांमध्ये चकमक सुरू आहे. सुरुवातीला झालेल्या गोळीबारात दोन सैनिक जखमी झाले आहेत. यापूर्वी कठुआ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू आणि दोघे जखमी झाले होते. या घटनेच्या काही तासात तिसरा हल्ला झाला. तीन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी तीर्थयात्रेकरूंच्या बसवर हल्ला केला होता. बस दरीत कोसळली होती. यात 9 भाविकांचा मृत्यू झाला होता. तर चाळीसहून अधिक जखमी झाले होते. 

दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन नागरिकांची हत्या आणि अपहरण केल्याचं वृत्त खोटं आहे. कठुआच्या घटनेत केवळ एक नागरिक जखमी झाला आहे. दुसरीकडे त्या परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी अभियान सुरू आहे. अतिरिक्त पोलीस महानिर्देशक आनंद जैन यांनी सांगितलं की, जिल्ह्याच्या चतरगला भागात चार राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिसांच्या एका संयुक्त चौकीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. 

Advertisement

दहशतवादी हल्ल्यात एक जखमी
सुरक्षा दलाने मंगळवारी सायंकाळी कठुआ जिल्ह्याच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळील एका गावावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक अभियान सुरू आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक नागरिक जखमी झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कठुआ अभियानात सुरक्षा दलाने एका संशयास्पद पाकिस्तानी दहशतवाद्याची हत्या केली आहे. 
 

Advertisement