जाहिरात

J&K Pahalgam Attack : अखेर गुन्हेगारांची ओळख पटली, 26 जणांना न्याय मिळणार; दहशतवाद्यांचे फोटो आले समोर

 जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवाद्यांचे फोटो आता समोर आले आहेत.

J&K Pahalgam Attack : अखेर गुन्हेगारांची ओळख पटली,  26 जणांना न्याय मिळणार; दहशतवाद्यांचे फोटो आले समोर

Jammu Kashmir Pahalgam Attack  : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवाद्यांचे फोटो आता समोर आले आहेत. सैन्य आणि स्थानिक पोलिसांच्या विशेष टीमने या दहशतवाद्यांना पकड्यासाठी शोध मोहीत राबवित आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात सहा दहशतवाद्यांचा समावेश होता. सुरक्षा एजन्सीने यापूर्वी दहशतवाद्यांचे तीन स्क्रेच प्रसिद्ध केले होते. केंद्रीय एजन्सीच्या सूत्रानुसार, प्रतिबंधित पाकिस्तान स्थित लष्कर-ए-तोय्यबाशी संबंधित द रेजिस्टेंस फ्रंटने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सैन्याच्या मोहिमेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. अमित शाह घटनास्थळीही गेले होते. या हल्ल्यात आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार, 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी आहेत. 

Jammu Kashmir Pahalgam : 'मुलासमोर त्याच्या वडिलांच्या डोक्यात गोळी झाडली', डोंबिवलीतील तिघांचा हकनाक बळी

नक्की वाचा - Jammu Kashmir Pahalgam : 'मुलासमोर त्याच्या वडिलांच्या डोक्यात गोळी झाडली', डोंबिवलीतील तिघांचा हकनाक बळी

द रेजिस्टेंस फ्रंट संघटना काय आहे?


द रेजिस्टेंस फ्रंट प्रतिबंधित पाकिस्तान स्थित लष्कर-ए-तैय्यबाचा (LET) एका प्रॉक्सी दहशतवादी संघटना आहे. ज्याचं गठण 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 हटविण्यात आलं होतं. याची सुरुवात एक ऑनलाइन युनिट होतं. मात्र तहरीक-ए-मिल्लत इस्लामिया आणि गजनवी हिंद सारख्या संघटना एकत्र येत ही संघटना दहशतवादी समूहात विकसित झाली. 

Latest and Breaking News on NDTV

दहशतवादी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची संपूर्ण यादी... 

1    लेफ्टिनेंट विनय नरवाल -     हरियाणा
2    मंजु नाथ -    कर्नाटक
3    शुभम द्विवेदी - उत्तर प्रदेश
4    संजय लेले - महाराष्ट्र
5    अतुल मोने - महाराष्ट्र
6    दिलीप डिस्ले - महाराष्ट्र
7    संतोष जगदाले - महाराष्ट्र
8    कौस्तुभ गनबोटे - महाराष्ट्र
9    प्रशांत कुमार    
10   मनीष रंजन    
11    सैयद हुसैन शाह - जम्मू कश्मीर
12    सुशील नथयाल - मध्य प्रदेश
13    हेमंत सुहास जोशी - महाराष्ट्र
14    नीरज उधवानी - उत्तराखंड
15    बीतन अधिकारी - पश्चिम बंगाल
16    सुदीप  न्यौपाने - नेपाल
17    मनीष रंजन - बिहार
18    एन रामचंद्रन - केरला
19    दिनेश अग्रवाल - चंडीगढ़
20    समीर गुहार - पश्चिम बंगाल
21    जे सचिंद्र मोली - आंध्रप्रदेश
22    मधुसूदन सोमस्टी - कर्नाटक 
23    संतोष जहदा - कर्नाटक
24    भारत भूषण - कर्नाटक
25    सुमित परमार - गुजरात 
26    यतेश परमार - गुजरात

Listen to the latest songs, only on JioSaavn.com