जाहिरात

Jammu Kashmir Pahalgam : 'मुलासमोर त्याच्या वडिलांच्या डोक्यात गोळी झाडली', डोंबिवलीतील तिघांचा हकनाक बळी

 जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.

Jammu Kashmir Pahalgam : 'मुलासमोर त्याच्या वडिलांच्या डोक्यात गोळी झाडली', डोंबिवलीतील तिघांचा हकनाक बळी

Jammu Kashmir Pahalgam : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. डोंबिवलीतील संजय लेले, अतुल मोने, हेमंत जोशी, पनवेलमधील दिलीप देसले, पुण्यातील कौस्तुभ गणबोटे, संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला आहे. 

पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मृतांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत तत्परतेने करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः कार्यरत आहे.

डोंबिवलीचे कौस्तुभ लेले यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा संताप व्यक्त केला आहे. या हल्ल्यात डोंबिवलीतील संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी या तिघांचा मृत्यू झाला. कौस्तुभ लेले यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या हल्ल्यात त्यांचा भाऊ संजय लेले आणि बालमित्र हेमंत जोशी यांचा हकनाक बळी गेला. माझ्या पुतण्यासमोर त्याच्या वडिलांच्या डोक्यात गोळी घालण्यात आली. व्यक्त करावा तेवढा संताप कमी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 

Pahalgam Attack: 'पुढच्या 10 पिढ्यांचा थरकाप उडायला हवा...',  पहलगाम हल्ल्यानंतर राज ठाकरेंचा संताप

नक्की वाचा - Pahalgam Attack: 'पुढच्या 10 पिढ्यांचा थरकाप उडायला हवा...', पहलगाम हल्ल्यानंतर राज ठाकरेंचा संताप

पनवेलमधील कामोठेचे 2 रहिवासी जखमी

पहलगाम हल्ल्यात पनवेलमधील कामोठेचे 2 रहिवासी जखमी झाले असून सुबोध पाटील आणि माणिक पाटील हे दोघेही पती-पत्नी असून, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर श्रीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची प्रशासनाची माहिती आहे. सुबोध पाटील हे कस्टम विभागातून सेवावृत्त झालेले कर्मचारी आहेत. घटनेनंतर कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विमल बिडवे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. 

Pahalgam terrorist attack: जम्मू- काश्मीरमध्ये आतापर्यंत कधी झालेत दहशतवादी हल्ले? वाचा संपूर्ण लिस्ट

नक्की वाचा - ​​​​​​​Pahalgam terrorist attack: जम्मू- काश्मीरमध्ये आतापर्यंत कधी झालेत दहशतवादी हल्ले? वाचा संपूर्ण लिस्ट

यादीतील 26 जखमी व्यक्तींची नावे आणि त्यांची शहरे खालीलप्रमाणे 


 * माणिक पाटील - पुणे
 * सुबोध पाटील - मुंबई
 * एस. भालेराव - पुणे
 * आसवाज जगदाळे - पुणे
 * प्रगती जगदाळे - पुणे
 * संतोष जगदाळे - पुणे
 * कौस्तुभ गंभोळे - पुणे
 * नेहा तुषार वाघचौरे - जळगाव
 * दिलीप जयराम ढसाळे - रायगड
 * अतुल श्रीकांत मोने - ठाणे
 * हेमंत सुहास लेले - ठाणे
 * संजय लक्ष्मण लेले - ठाणे
 * अनुष्का अतुल मोने - ठाणे
 * रुचा अतुल मोने - ठाणे
 * मोनिका हेमंत जोशी - ठाणे
 * ध्रुव हेमंत जोशी - ठाणे
 * कविता संजय लेले - ठाणे
 * हर्षाली संजय लेले - ठाणे
 * शोभीत पटेल - मुंबई
 * सिमरन रुपचंदानी - नागपूर
 * तिलक रुपचंदानी - नागपूर
 * गौरव रुपचंदानी - नागपूर
 * संदीप ज्ञानेश्वर साबळे - जालना
 * तेजस्विनी संदीप साबळे - जालना
 * कौस्तुभ संदीप साबळे - जालना
 * अनन्या अरविंद आवळे - भंडारा

श्रीनगरमध्ये पर्यटकांसाठी २४x७ मदत कक्ष सुरू करण्यात आला असून जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात 24 तास कार्यरत असलेला आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि मदत डेस्क स्थापित करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून पर्यटकांना कोणत्याही वेळी मदत मिळू शकेल. त्यांना काही अडचण आल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत ते खालील क्रमांकावर संपर्क साधू शकतात:
दूरध्वनी क्रमांक:

01942483651
0194245743
व्हॉट्सॲप क्रमांक:

7780805144
7780938397