Bride Shot at During Wedding : बिहारमधील बक्सर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका माथेफिरू तरुणाने एकतर्फी प्रेमातून भर मांडवात नवरीवर गोळी झाडली. या घटनेमुळे लग्नाच्या आनंदाचे रूपांतर क्षणात भयाण शांतता आणि दहशतीत झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चौसा येथील मल्लाह टोलीमध्ये ही वरात आली होती. लग्नाचे सर्व विधी आनंदी वातावरणात सुरू होते. नवरदेव आणि नवरी स्टेजवर जयमाला विधीसाठी सज्ज होते. नातेवाईक फोटो काढण्यात आणि गाणी वाजवण्यात मग्न होते. त्याच वेळी एका माथेफिरू तरुणाने गर्दीतून पुढे येत नवरीच्या दिशेने गोळी झाडली. गोळी लागताच नवरी खाली कोसळली. या भयावह घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये गोळीबारानंतर लोकांचा आरडाओरडा स्पष्टपणे दिसत आहे.
पाहा VIDEO
हाथों में जयमाला थी, आंखों में सुनहरे सपने... पर एक 'सिरफिरे' की सनक ने सब लहूलुहान कर दिया!
— sumit kumar (@eyeamsumit) February 25, 2026
बिहार में स्टेज पर दूल्हे के सामने दुल्हन को गोली मार दी गई। आखिर हम किस समाज की ओर बढ़ रहे हैं? डिग्रियां बटोर लेना ही शिक्षा नहीं है। जब तक व्यवहार में शालीनता और संस्कारों में 'न'… pic.twitter.com/bT0Bw2Xea5
(नक्की वाचा- Mumbai News: नागरिकांच्या जीवाशी खेळ; फळांना उंदीर मारायचं औषध लावणाऱ्या फळविक्रेत्याचा VIDEO व्हायरल)
नवरीची प्रकृती चिंताजनक
गोळी लागल्यानंतर जखमी मुलीला तातडीने बक्सरच्या सदर रुग्णालयात नेण्यात आले. सदर रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे पाहून प्राथमिक उपचार केले. रक्तस्त्राव जास्त झाल्यामुळे आणि प्रकृती हाताबाहेर जात असल्याचे पाहून डॉक्टरांनी तिला अधिक चांगल्या उपचारांसाठी वाराणसी येथील ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर केले आहे.
(नक्की वाचा- Solapur News: गल्लीत कुस्ती, दिल्लीत दोस्ती! केंद्र सरकारकडून धैर्यशील मोहिते-पाटलांना मोठी जबाबदारी)
एकतर्फी प्रेमाचा धक्कादायक प्रकार
प्राथमिक तपासात हा प्रकार एकतर्फी प्रेमातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आरोपी तरुणाने लग्नाला विरोध करण्यासाठी किंवा वैफल्यातून हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपीचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी छापेमारी सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world