झारखंडमध्ये नव्या सरकारच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्य शासनाच्या 'मैय्या सन्मान' योजनेंतर्गत महिलांना मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. आता महिलांना 2500 रुपये मिळणार आहेत. ही रक्कम डिसेंबर महिन्यापासून लाभार्थी महिलांना देण्यात येणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या विजयात महिलांनी निर्णायक भूमिक निभावली. महिलांना मैय्या सन्मान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक लाभाचा फायदा सोरेन सरकारला झाला. त्यामुळेच हेमंत सोरेन यांचा सरकार पुन्हा झारखंडमध्ये आल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजनेमुळे महिलांनी महायुती सरकारला साथ दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुती सरकारदेखील दिलेला शब्द पाळून पात्र महिलांना मिळणाऱ्या रकमेत वाढ करुन रिटर्न गिफ्ट देईल, अशी आशा महिलांना आहे.
(नक्की वाचा- Maharashtra New MLA : राज्यातील 288 नवीन आमदार कोण? वाचा संपूर्ण यादी)
काय आहे मैया सन्मान योजना?
झारखंडमध्ये हेमंत सोरेन सरकारने यावर्षी ऑगस्टमध्ये 'मैय्या सन्मान योजना' सुरू केली. या योजनेअंतर्गत 21 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांना प्रत्येक महिन्याला 1,000 रुपयांची आर्थिक मदत मिळते. या योजनेचा फायदा राज्यभरातील सुमारे 50 लाख महिलांना होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
झारखंडमध्ये तर महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त होती. 81 पैकी 68 जागांवर महिलांनी जास्त मतदान केले. नोंदणीकृत 2.61 कोटी मतदारांपैकी 1.76 कोटींहून अधिक लोकांनी मतदान केले. त्यात 1.29 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की 91.16 लाख महिला मतदारांनी मतदान केले, जे पुरुषांच्या मतदानापेक्षा 5.52 लाख अधिक आहे.
(नक्की वाचा- मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार; मात्र CM शिंदेंनी अमित शाहांकडे काय मागितलं?)
महाराष्ट्रातही लाडकी बहीण ठरली गेमचेंजर
महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारला फायदा झाल्याचं बोललं जात आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1500 रुपये दिले जात आहे. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आलं तर ही रक्कम 1500 वरुन 2100 करु असा शब्द महायुतीच्या नेत्यांना दिला होता. त्यामुळे झारखंडनंतर महाराष्ट्रातही महिलांना 2100 रुपये अशी आशा आहे.