Wall Collapses VIDEO : नशीब काय असतं? असं कुणी विचारलं तर झारखंडमधील एक व्हायरल होत असलेला व्हिडीओ तुम्ही दाखवू शकता. झारखंडमधील रांची येथे मुसळधार पावसात भिंत कोसळण्याची एक थरारक घटना घडली आहे. सुदैवाने, ऐनवेळी तेथून जात असलेल्या एका महिलेचा जीव थोडक्यात बचावला. हा संपूर्ण प्रसंग एका व्हिडीओमध्ये कैद झाला असून तो सध्या व्हायरल होत आहे. भिंत कोसळत असतानाही महिला सुखरूप बाहेर पडल्यामुळे नशिबानेच तिला वाचवले, अशी प्रतिक्रिया लोक देत आहेत.
व्हिडीओमधील दुश्यांनुसार, जोरदार पाऊस सुरू असताना एक महिला रस्त्यावरून जात आहे. ती एका अरुंद गल्लीतून बाहेर येत असतानाच अचानक एक मोठी भिंत कोसळू लागते. भिंतीचा मोठा भाग तिच्या अगदी जवळून खाली पडतो. मात्र, भिंत कोसळत असताना ती त्वरीत किंचित मागे सरकते. यामुळे भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सापडण्यापासून ती वाचली.
(नक्की वाचा- अर्रर्र! स्टेजवरच लेहंग्याची पिन निघाली, तरीही ती नाचत राहिली; 14 लाख लोकांनी पाहिलाय 'हा' VIDEO)
व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाला महिलेचा जीव वाचल्याने समाधान वाटले, पण त्याचबरोबर अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये सुरक्षिततेची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीवही झाली.