जाहिरात

Judiciary Exams 2025 : न्यायिक सेवा परीक्षेसाठी मोठी अट, 'CET 2025' साठी नवीन नियम जाहीर

Judiciary Exams 2025 : न्यायिक सेवा परीक्षेसाठी मोठी अट, 'CET 2025' साठी नवीन नियम जाहीर
Judiciary Exams 2025 : या परीक्षेसाठी एक नवा नियम लागू झाला आहे.
मुंबई:

Judicial Services Exam :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे, यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेसाठी 'कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (CET) 2025' जाहीर केली आहे.

महत्त्वाच्या तारखा आणि नियम:

जाहिरात प्रसिद्धी: 29 जुलै रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली.
अर्ज प्रक्रिया: 1 ऑगस्टपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.

नवीन नियम: सर्वोच्च न्यायालयाच्या 20 मे च्या आदेशानुसार, 'न्यायिक सेवा CJ-JD' आणि 'JMFC' परीक्षेसाठी पात्र होण्याकरिता किमान तीन वर्षांचा कायदेशीर सराव (legal practice) अनिवार्य आहे.

( नक्की वाचा : Pratap Sarnaik : तुम्हीही ओला-उबरच्या मनमानी भाड्याने हैराण आहात का? वाचा परिवहन मंत्र्यांनी काय केले )
 

कोणती कागदपत्रं आवश्यक?

  • उमेदवारांनी अर्ज सादर करताना सनद आणि न्यायालयीन सरावाचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
  • ज्या उमेदवारांनी आधीच अर्ज भरले आहेत, त्यांना अर्जाची प्रत, सनद आणि अनुभव प्रमाणपत्र 25 ऑगस्टपर्यंत bartijmfc@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवणे बंधनकारक आहे.
  • बार्टी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, निर्धारित मुदतीत आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास उमेदवाराचा 'CET 2025' साठी विचार केला जाणार नाही.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com